Amitabh Bachchan
Amitabh Bachchan  Esakal
मनोरंजन

'''चुम्मा' गायलं मी, घेतला त्यांनी'' कपिलच्या शोमध्ये सुदेश भोसलेंची फटकेबाजी

सकाळ ऑनलाइन टीम

The Kapil Sharma Show: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये द कपिल शर्माचा शो हा लोकप्रिय आहे. त्याची नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होत असते. दोन (Tv Entertainment) आठवड्यांपूर्वी हा शो काश्मीर फाईल्समुळे चर्चेत आला होता. या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी कपिलनं नकार दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली होती. त्यामुळे कपिलवर सोशल मीडियातून प्रचंड टीका झाली होती. त्य़ाला नेटकऱ्यांनी ट्रोलही केले होते. आता कपिलचा शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यानं यावेळी प्रसिद्ध गायक सुदेश भोसले (Sudesh Bhosle) यांना शो मध्ये निमंत्रित केलं होतं. भोसले यांनी आपल्या गायकीच्या प्रवासातील वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला. त्यात एक प्रसंग सांगताना त्यांनी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यावर मिश्किल टिप्पणी केल्याचे दिसुन आले आहे.

कपिल शर्माच्या आगामी एका शोमध्ये सुदेश भोसले यांची आगळी वेगळी मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्या शो चा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या आठवड्यात कपिल शर्मा हा भजन सम्राट अनुप जलोटा, सुदेश भोसले आणि शैलेंद्र सिंग यांच्याशी संवाद साधताना दिसणार आहे. व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये सुदेश भोसले आणि अनुप जलोटा यांची इंट्री होते. यावेळी कपिल शर्मा भोसले यांच्याविषयी सांगतो की, अमिताभ बच्चन हे त्यांच्या वेळेसाठी फार प्रसिद्ध आहेत. याचे महत्वाचे काऱण म्हणजे, त्यांना नेहमी अशी भीती वाटत असते की, आपण लवकर आपल्या शुटींगच्या ठिकाणी पोहचलो नाहीतर सुदेश भोसले त्याठिकाणी जावून डबिंग पूर्ण करतील. त्यावर प्रेक्षकांकड़ून भोसले यांना उस्फुर्त दाद मिळते. त्यानंतर भोसले यांनी चुम्मा जुम्मा गाण्याचा किस्सा सांगितला. त्यालाही उपस्थित प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला. ते गाणं गायलं मी त्याचं श्रेय घेतलं त्यांनी....

कपिलनं यावेळी आपल्या शो मध्ये आलेल्या त्या तीनही गायकांची मोठी फिरकी घेतली. तो म्हणाला, शैलेंद्र, अनुप जलोटा आणि सुदेश भोसले तुमची मैत्री पाहून तुमच्यावर जिंदगी मिलेगी ना दोबारा सारखा चित्रपट यायला हवा. त्यात सुदेश भोसले फरहान अख्तर, शैलेंद्र अभय देओल आणि अनुप जलोटा ऋतिक रोशन यांची भूमिका करतील. हे ऐकून त्या तिघांनाही हसु आवरत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याणमधून ठाकरे उमेदवार बदलणार? आणखी एक अर्ज दाखल झाल्यानं चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

Aranmanai 4 Twitter Review: कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणालं, 'जबरदस्त VFX'; तमन्नाच्या 'अरनमनई 4'नं जिंकली नेटकऱ्यांची मनं

Naach Ga Ghuma Review: 'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड

IND vs PAK T20 World Cup 24 : सामना भारत - पाकिस्तानचा फायदा न्यूयॉर्कच्या हॉटेल्सचा! तब्बल 600 टक्क्यांनी वाढलं रूम्सचं भाडं

SCROLL FOR NEXT