The Kapil sharma SHow to be back with a new season,new actors?Read details Google
मनोरंजन

Kapil Sharma Show: नवा सिझन,नवे कलाकार,जुन्यांची एक्झिट? काय आहे भानगड?

'द कपिल शर्मा शो' ची टीम सध्या नॉर्थ अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे, तिथून परतल्यावर नवा सिझन सुरु होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

प्रणाली मोरे

छोट्या पडद्यावरचा 'द कपिल शर्मा शो'(The Kapil Sharma Show) हा सगळ्यात प्रसिद्ध शो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या शो ने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. कृष्णा अभिषेक पासून कीकू शारदा सारख्या विनोदवीरांनी लोकांना पोट धरुन हसायला भाग पाडलं. बॉलीवूडच्या(Bollywood) अनेक सेलिब्रिटींनी या शो मध्ये हजेरी लावली आणि आपल्या आयुष्याविषयी अनेक खुलासे त्यांनी केलेले आपण पाहिले. सध्या या शो नं छोट्या पडद्यावरुन काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. (The Kapil sharma SHow to be back with a new season,new actors?Read details)

कारण पूर्ण टीम लाइव्ह परफॉर्मन्ससाठी नॉर्थ अमेरिकेच्या दौऱ्यावर गेली आहे. यामुळे चाहत्यांना चिंता सतावतेय की कधी या शो चा नवा सिझन पुन्हा टी.व्ही वर पहायला मिळणार आहे . पण सध्या बातमी कानावर पडतेय की या शो मध्ये अनेक नवीन कलाकारांची एन्ट्री होणार आहे. पण त्यामुळे कुणी शो मधून एक्झिट तर घेत नाही ना याविषयी देखील चर्चा रंगलेली पहायला मिळतेय.

कपिल शर्माची पूर्ण टीम म्हणजे स्वतः कपिल,सुमोना,कृष्णा अभिषेक,कीकू शारदा आणि चंदन हे सारे परदेशात लोकांना हसवण्यात सध्या बिझी आहेत. तर दुसरीकडे कपिल शर्मा शो च्या नव्या सिझनची चर्चा सुरू झाली आहे. लोक प्रश्न विचारतायत की शो पुन्हा कधी सुरू होणार? नवा सिझन केव्हा येणार की जुनाच सुरू ठेवणार? चला,याविषयी नवीन माहिती मिळालीय ती जाणून घेऊया.

एका वेबसाईटला मिळालेल्या वृत्तानुसार,'द कपिल शर्मा शो' लवकरच चाहत्यांच्या भेटीस येईल,फार काळ लागणार नाही. काही महिने आधीच टीमने काम पूर्ण केलं होतं आणि त्यानंतरच ते नॉर्थ अमेरिका टूरवर निघून गेले. पण आता हा शो नवा सिझन घेऊन येत आहे. दावा केला जातोय की,येत्या सप्टेंबर महिन्यात या शो ला सुरुवात होईल.

एवढंच नाही तर ,'द कपिल शर्मा शो' च्या नव्या सिझनमध्ये काही नवीन कलाकारांची देखील एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या सिझनमध्ये कॉमेडियन कृष्णा अभिषेक,चंदन प्रभाकर,सुमोना चक्रवर्ती,कीकू शारदा,भारती सिंग दिसले होते. स्पेशल गेस्ट म्हणून जजच्या खूर्चीत अर्चना पूराण सिंग होती. पण आता हे नवीन कलाकार कोण यावर चाहते शक्कल लढवताना दिसत आहेत. त्याचबरोबर शो मधून कुणी एक्झिट करतंय का? करतंय तर कोण? यावर देखील चाहते नावांची यादी तयार करताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT