Archana Puran Singh speaks on The Kashmir Files Google
मनोरंजन

The Kashmir Files: सिनेमाविषयी काय म्हणाल्यात कपिल शर्मा शो च्या 'जज'

'The Kapil Sharma Show' मध्ये 'The Kashmir Files' सिनेमाला प्रमोशनसाठी बोलावलं नाही म्हणून चांगलाच वाद रंगला होता.

प्रणाली मोरे

'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir Files) हा सिनेमा पाहिल्यांनतर प्रत्येकजण आपले मुद्दे आणि विचार मांडताना दिसत आहे. बॉलीवूडमधील प्रतिष्ठांनी सिनेमावर मौन बाळगणं पसंत केलं असताना परफेक्शनिस्ट आमिर खान त्यावर व्यक्त झाला अन् त्याची चर्चा सुरू झाली आहे. सिनेमा प्रदर्शनाआधी निर्माता-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) यांना सिनेमाच्या प्रमोशनसाठी,सिनेमा लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली होती. खूप मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला होता. पण आज सिनेमाची भारतभरात प्रशंसा केली जात आहे. 'द कपिल शर्मा शो' मध्ये सिनेमात मोठे स्टार नसल्याने प्रमोशनसाठी निमंत्रण न मिळाल्याचा राग दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी व्यक्त केला अन् त्या विषयाला वादाचा रंग चढला.

या प्रकरणावर 'कपिल शर्मा शो'(Kapil Sharma Show) मध्ये जजच्या खूर्चीत विराजमान असलेल्या अर्चना पुराण सिंग यानी देखील या वादावर आता आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'द कपिल शर्मा शो' मध्ये जज ची भूमिका साकारणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्री अर्चना पुराण सिंग(Archana Purana SIngh) यांना 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाविषयी प्रश्न विचारला गेला होता. त्यांना विचारलं होतं, 'काश्मिर फाईल्स हा सिनेमा कपिल शर्मा शो मध्ये प्रमोशन करण्यास पात्र ठरतोय का?' त्यावर अर्चना पुराण सिंग यांनी 'नो कमेंट्स प्लीज' असं म्हटलं आहे. थांबलेला वाद पुन्हा सुरू होऊ नये हा विचार करुनच अर्चना पुराण सिंग यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं असावं अशी चर्चा आता रंगते आहे.

कपिल शर्मानं मात्र मौन सोडत आपली बाजू मांडली होती. कपिल शर्मानं यांसंदर्भातला अनुपम खेर यांचा एक व्हिडीओ शेअर करीत म्हटलं होतं,''माझ्या विरोधातील खोट्या आरोपांवर खरं काय ते सांगितलं यासाठी धन्यवाद पाजी. त्या सगळ्यांचे मी आभार मानतो,ज्यांनी सत्य जाणून नं घेता मला सपोर्ट केला आणि माझ्यावर प्रेम केलं, हसत रहा''. या व्हिडीओला अर्चना पुराण सिंगने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं होतं.

हा सगळा वाद तेव्हा सुरू झाला होता,जेव्हा 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कपिल शर्माच्या शो विषयी विरोधात जाऊन भाष्य केलं होतं. तेव्हा कपिल शर्माला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं होतं. इतकंच नाही शो वर बहिष्कार आणायची देखील मागणी केली होती. या सगळ्या वादावर अनुपम खेर यांनी मौन तोडत म्हटलं होतं,''कपिलच्या शो मध्ये मला बोलावलं गेलं होतं पण या सिनेमाचा गंभीर विषय पाहता मी अशा विनोदी धाटणीच्या शो मध्ये प्रमोशनला जाण्यास नकार दिला होता''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack : वन विभागाच्या दुर्लक्षामुळे निष्पाप तरुणाचा बळी? लोहशिंगवेत बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

Raisin Rate Hike : दिवाळीनंतर बेदाण्याला उच्चांकी दर, एका किलोला तब्बल ४१० रुपये मिळाल्याने शेतकऱ्यामध्ये समाधान

Latest Marathi News Live Update : पुण्यात अजित पवार यांची महत्त्वाची बैठक

Railway Employees Protest: रेल्वे आंदोलन परवानगीशिवाय! अहवाल मागवला; कारवाई होणार

Video : थाटात पार पडला जयवंत वाडकरांच्या लेकीचा साखरपुडा ! मल्याळी जावई आणि स्वामी समर्थांचं कनेक्शन

SCROLL FOR NEXT