The Kashmir Files controversy esakal
मनोरंजन

Kashmir Files: 'खोटं किती उंच झालं तरी....' अनुपम खेर यांचं सुचक वक्तव्य

इफ्फी आंतरराष्ट्रीय महोत्सवाची सांगता झाली आहे. मात्र शेवटचा दिवस महोत्सवाचे चेअरमन आणि प्रमुख ज्युरी नदाव लॅपिड यांच्या वक्तव्यानं चर्चेत आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

The Kashmir Files Contraversy: इफ्फी आंतरराष्ट्रीय महोत्सवाची सांगता झाली आहे. मात्र शेवटचा दिवस महोत्सवाचे चेअरमन आणि प्रमुख ज्युरी नदाव लॅपिड यांच्या वक्तव्यानं चर्चेत आला आहे. त्यामध्ये त्यांनी काश्मीर फाईल्सला अश्लील असं म्हटलं आहे. त्यावरुन आता सोशल मीडियावर लॅपिड यांच्यावर सडकून टीका होताना दिसते आहे. दुसरीकडे त्यांना प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.

लॅपिड यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात महोत्सवातील चित्रपट आणि त्यातील काही खास गोष्टींवर भाष्य केले. ते म्हणाले, बऱ्याचशा चांगल्या कलाकृती होत्या. मात्र एका चित्रपटानं नाराजी केली. ती म्हणजे द काश्मीर फाईल्स. या चित्रपटातील हिंसा, क्रौर्य हे विषण्ण करणारं होतं. हा चित्रपट अश्लील असून तो केवळ प्रोपगंडा चित्रपट आहे. असे धक्कादायक विधान त्यांनी केले होते. त्यावरुन त्यांच्यावर चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलावंत यांनी टीका केली आहे.

हेही वाचा - दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

काश्मीर फाईल्समध्ये महत्वाची भूमिका साकारलेल्या अनुपम खेर यांनी लॅपिड यांना चांगलेच सुनावले आहे. ते म्हणाले, खोट्याची उंची किती का जास्त असेना मात्र सत्यासमोर ते नेहमीच खुजं असतं. हे लॅपिड यांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. खेर यांच्या त्या व्टिटला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. कालपासून काश्मीर फाईल्स आणि त्यावर टीका करणारे लॅपिड हे चर्चेत आले आहे. ज्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दीडशे कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला त्या चित्रपटावर लॅपिड यांनी केलेली टीका चाहत्यांच्या जिव्हारी लागली आहे.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आता व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. काहींनी लॅपिड हे कोण आहेत याविषयीचा शोध घेतला आहे. बॉलीवूडमध्ये ज्या चित्रपटानं गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर वेगळ्या वातावरणाची निर्मिती केली. केवळ सोशल मीडियावरील मार्केटींग स्टॅट्रजीनं प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यास प्रवृत्त केले. असे ज्या चित्रपटाच्याबाबत म्हटले जाते त्या द काश्मिर फाईल्स या चित्रपटावरील वाद अजुनही थांबलेले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT