The Kashmir Files esakal
मनोरंजन

The Kashmir Files: काश्मीर फाईल्सवर मोदी काय म्हणाले?

बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटाची मोठया प्रमाणावर चर्चा आहे.

सकाळ डिजिटल टीम

The Kashmir Files: बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटाची मोठया प्रमाणावर चर्चा आहे. ज्वलंत विषयाची मांडणी करुन अग्निहोत्री यांच्या (Bollywood Movies) या चित्रपटानं लक्ष वेधून घेतलं आहे. काश्मिर पंडितांवर झालेल्या अन्याय आणि अत्याचार हा विषय केंद्रस्थानी ठेवून (Bollywood News) त्याची प्रभावी सादरीकरण अग्निहोत्री यांनी केली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत. सुरुवातीला काश्मिरमध्येच या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. त्यालाही तेथील प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणाले हे आपण जाणून घेणार आहोत.

द काश्मिर फाईल्स हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्यावरुन वेगवेगळया प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन व्हायरल झाल्या होत्या. सेन्सॉर बोर्डानं देखील निर्माते आणि दिग्दर्शक यांना या चित्रपटातील अनेक प्रसंगांना कात्री लावण्यास सांगितले होते. त्यामुळे दिग्दर्शकांनी त्यावरुन नाराजी व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी कपिल शर्माच्या शो मध्ये या चित्रपटाच्या प्रमोशनवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावरुन मोठी आरोप प्रत्यारोपांची राळ उडाली होती. मात्र जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून बॉक्स ऑफिसवर त्यानं विक्रमी कमाई केल्याचे दिसून आले आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट कमालीचा आवडल्याचे दिसून आले आहे.

आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील द काश्मीर फाईल्स या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मोदींनी चित्रपटाची स्तुती करताना चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनाही धन्यवाद दिले आहे. अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी सोशल मीडियावर मोदींच्या भेटीचे फोटो शेयर केले आहेत. यावेळी निर्माता अभिषेक अग्रवाल देखील उपस्थित होते. त्यांनी लिहिलं आहे की, मोदींनी आमच्या चित्रपटाचे कौतूक केले याबद्दल त्यांचे धन्यवाद. आम्ही जे काही तयार केले त्याची त्यांनी दखल घेतली यासाठी त्यांचे विशेष आभार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT