The Kerala Story Esakal
मनोरंजन

The Kerala Story: 'कोणी द केरळ स्टोरी विकत घेता का विकत..', ओटीटीसाठी खरेदीदार मिळेना!

Vaishali Patil

The Kerala Story: सुदीप्तो सेनचा 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट रिलिजपुर्वीच वादात अडकला होता. टिझर आणि ट्रेलरच्या वादात हा चित्रपट 5 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मात्र रिलिजनंतर वादाच्या आणि पाठिंब्याच्या सत्रात द केरळ स्टोरीच्या बॉक्स ऑफिस कमाईने बाजी मारली. बाद होऊनही चित्रपटाने 37 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 238.42 कोटींची कमाई करत नवा इतिहास रचला. केवळ 30 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला.

अलीकडेच हा चित्रपट ओटीटीवर रिलिज होणार अशी बातमी समोर आली होती मात्र आता चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेनने एक धक्कादायक खुलासा केला आहे. ओटीटीवर चित्रपटाला खरेदीदार मिळत नसल्याचं त्यांनी सांगतिलं आहे.

चित्रपटसृष्टीत या चित्रपटाविरोधात एक टोळी तयार झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सुदीप्तो सेन या चित्रपटाला OTT वर चांगली डील न मिळत नसल्याने निराश झाले आहे.

'रेडिफ'शी या माध्यामाशी संवाद साधताना सुदीप्तो सेन म्हणाले की, 'द केरळ स्टोरी' ही चित्रपट सध्या कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार नाही आहे. समोर येत असलेल्या बातम्या खोट्या आहेत.'

ते पुढे म्हणाले की, 'आतापर्यंत कोणताही चांगला प्रस्ताव आलेला नाही. आम्हाला शिक्षा देण्यासाठी फिल्म इंडस्ट्री एकत्र आल्याचं दिसत आहे. आमच्या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवरील यशाने चित्रपट उद्योगातील अनेक भाग अस्वस्थ केले आहेत.'

चित्रपटाला मिळालेल्या यशाची शिक्षा देण्यासाठी मनोरंजन उद्योगातील एक वर्ग एकत्र आला असल्याच आम्हाला वाटते असंही ते म्हणाले. याशिवाय प्रेक्षकांचा एक वर्गही या चित्रपटावर प्रचंड नाराज असल्याच्या चर्चाही आहेत,

हा चित्रपट केरळमधील काही महिलांची कथा सांगतो ज्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास आणि नंतर ISIS मध्ये सामील होण्यास भाग पाडले गेले. 'द केरळ स्टोरी' याचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून विपुल अमृतलाल शाह यांनी निर्मिती केली आहे. तर कलाकारांबद्दल सांगायचं झाल तर अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी मुख्य भूमिकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT