Adah Sharma Birthday Esakal
मनोरंजन

Adah Sharma Birthday: द केरळ स्टोरीमधील 'फातिमा' शिवचरणी नतमस्तक!

Vaishali Patil

सध्या मनोरंजन अदा शर्मा आणि तिचा नुकताच प्रदर्शित झालेला 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट दोन्ही खुप चर्चेत आहेत. एकीकडे हा चित्रपट त्याच्या कथेवरून वादात सापडला आहे. तर दुसरीकडे या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर कमाईचा आलेखही उंचावतांना दिसत आहे.

या चित्रपटाने अदा शर्माला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवुन दिली आहे. ती गेल्या 15 वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम करत आहे, मात्र तिला याआधी कोणत्याही चित्रपटातून यश मिळाले नव्हते. हा चित्रपट तिच्या करिअरचा टर्निंग पॉइंट म्हणून ओळखला जात आहे.

अदा शर्माने आपल्या फिल्मी करिअरला अगदी लहान वयात सुरुवात केली होती. आज 11 मे रोजी तिचा वाढदिवस आहे. ती 31 वर्षांची आहे. एकीकडे चित्रपटावरुन वाद होत असतांना अदा तिच्या वाढदिवसानिमित्त भगवान शिवचरणी नतमस्तक झालेली आहे. त्यांचा आशिर्वीद घेण्यासाठी ती मंदिरात पोहचली आणि शिव नामाचा जाप केला आहे.

राजकीय गोंधळात अदाचा हा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती भक्तीमध्ये तल्लीन झालेली दिसत आहे. ती मंदिरात बसून शिव तांडव म्हणत आहे. तिचा हा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे.

अदा शर्माने तिचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ती मंदिरातील शिवलिंगासमोर बसलेली दिसत आहे. ती शिव तांडव पठण करत आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझ्या उर्जेचे रहस्य. ऊर्जा जी मला निर्बंधांचा सामना करण्याची परवानगी देते. मला तुमचं मानल्याबद्दल धन्यवाद.'

अदाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तिचे चाहते तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. त्याचबरोबर ते तिचं खुप कौतुकही करत आहेत.

अदा शर्मा तिच्या ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओंमुळे नेहमीच चर्चेत असते. 2008 मध्‍ये विक्रम भट्टच्‍या हॉरर चित्रपट 1920 मधून करिअरची सुरुवात केली. तिने साउथ चित्रपटांबरोबरच कमांडो 2, कमांडो 3 आणि बायपास रोडसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT