The Kerala Story
The Kerala Story esakal
मनोरंजन

The Kerala Story : 'केरळ स्टोरी' लोकांना आवडतोय! 3 ऱ्या दिवशी केली सर्वाधिक कमाई, आतापर्यत...

सकाळ डिजिटल टीम

The Kerala Story box office collection 3 day director sudeepto Sen : कुणी काही का म्हणेना पण सुदीप्तो सेन दिग्दर्शित द केरळा स्टोरीनं देशभरात सध्या वेगळेच वातावरण तयार केले आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचे होणारे प्रमोशन, त्यावरुन त्याच्याबाबतीत व्यक्त होणारी मतमतांतरं, प्रतिक्रिया या साऱ्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सलग तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं विक्रमी कमाई केल्याचे दिसून आले आहे.

विपुल अमृतलाल शहा यांची निर्मिती असलेल्या द केरळ स्टोरीनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. केरळमध्ये हिंदू मुलींच्याबाबत जे काही होते आहे ते वास्तव दिग्दर्शकानं या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. असे निर्मात्याचे म्हणणे आहे. यापूर्वी बत्तीस हजार मुलींचे धर्मांतर यावरुन वाद झाला होता. त्यात निर्मात्यानं आम्ही या चित्रपटातून त्या तीन मुलींविषयी बोलतो आहोत असे म्हटले होते. प्रेक्षकांना, नेटकऱ्यांनी केरळ स्टोरीवर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

देशातील अनेक संघटनांनी हा चित्रपट मोफत दाखविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मध्यप्रदेशन सरकारनं हा चित्रपट करमुक्त केला आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये देखील हा चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी करण्यात येत आहे. यासगळ्यात चित्रपटात मुख्य भूमिका केलेल्या अदा शर्मानं ज्या लोकांनी हा चित्रपट प्रोपंगडा असल्याचे म्हटले आहे त्यांना कडक शब्दांत सुनावले आहे. इसिस आणि केरळ असे दोन शब्द गुगल करा, म्हणजे परिस्थिती काय आहे हे समजेल. असे उत्तर तिनं दिलं आहे.

दुसरीकडे तामिळनाडू सारख्या राज्यात या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. तो त्या राज्यामध्ये प्रदर्शित होऊ दिलेला नाही. तामिळनाडू मल्टिप्लेक्स असोशिएशननं द केरळ स्टोरीचे स्क्रिनिंग होणार नाही याची काळजी घेतली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी या चित्रपटानं देशभरातून १६.५० कोटींची कमाई केली आहे. काश्मीर फाईल्स सारखाच हा चित्रपट देखील विक्रमी कमाई करेल. असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

द केरळ स्टोरीनं आतापर्यत ३५.७५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपट ज्यादिवशी प्रदर्शित झाला त्यादिवशी ८.०३ कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी ही कमाई ११.५०, १२.५० कोटी होती. पाच मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून देशातील एका वेगळ्या सामाजिक प्रश्नावर भाष्य केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT