the kerala story box office collection day 1 latest update director Sudipto Sen sakal
मनोरंजन

बाबो! The Kerala Story ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर उडवला धुरळा.. कमावले 'इतके' कोटी..

गेले काही दिवस या चित्रपटवरून बराच वाद सुरू आहे.

नीलेश अडसूळ

The Kerala Story Box Office Collection: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती विपुल अमृतलाल शाह यांच्या 'द केरल स्टोरी' या चित्रपटाची. विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मिर फाईल्स'नंतर हा चित्रपट सर्वाधिक चर्चेत आलेला सिनेमा आहे.

लव जिहादच्या नावाखाली महिलांचे होणारे शोषण आणि सद्यस्थिती सारख्या विषयाला चित्रपटातून वाचा फोडण्यात आली आहे. एका अत्यंत वेगळ्या विषयावरील मांडणी करत शाह यांनी हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला आहे.

शुक्रवार ५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बराच विरोधही झाला. एक गट या चित्रपटाच्या समर्थनार्थ ठाम उभा राहिला तर दुसरा गट या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत होता. पण अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई 'द केरला' स्टोरी'नं केली आहे.

(the kerala story box office collection day 1 latest update director Sudipto Sen)

या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच वादाला सुरुवात झाल्याने प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद कसा मिळेल याबाबत शंका होती. पण ते सर्व वाद आता मागे पडले आहेत. कारण सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरला स्टोरी'ने पहिल्या दिवशी किती कमावले याची आकडेवारी समोर आली आहे.

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पहिल्याच दिवशी ‘द केरला स्टोरी’ ने ७.५ कोटी कमावले आहेत. विशेष म्हणजे वीकएंड मध्ये हा चित्रपट अजून जोरदार कमाई करेल असा अंदाज अनेकांनी वर्तवला आहे. त्यामुळे आता या चित्रपटाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

का झाला विरोध?

या चित्रपटात केरळ मधील ३२ हजार महिलांचे धर्मांतर करून त्यांचे शोषण केल्याचे दाखवले आहे. परंतु हे दावे खोटे आहे असं म्हणत अनेक राजकीय पक्ष व धार्मिक संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणीही केली होती. एवढेच नाही तर हे हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु केरळ उच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी, जय पवार म्हणाले, बिनविरोधसाठी आमचा प्रयत्न पण...

MI vs DC Live : सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, नमन धीरने मुंबई इंडियन्सची लाज वाचवली; दिल्लीच्या गोलंदाजांसमोर इतरांची शरणागती

Mumbai Crime: नवरा कामावरुन परतला, बायको दारुच्या नशेत तर्रर्र; मोहम्मद कुरेशीवर पत्नीचा चाकूहल्ला

Dindori : कार विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू; रस्त्याच्या मधोमध असलेली विहीर बुजवण्यास सुरुवात, मालकावर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : साखरी जवळी तामसवाडी गावाजवळ अपघात

SCROLL FOR NEXT