The Kerala Story Update Instagram
मनोरंजन

''The Kerala Story बनवून मी इस्लाम धर्माची सेवा केली..'' असं का म्हणाले दिग्दर्शक सुदिप्तो सेन?

'द केरळ स्टोरी' सिनेमाच्या एका पत्रकार परिषदे दरम्यान निर्मात्यांनी धर्मांतर झालेल्या पीडित महिलांना कॅमेऱ्यासमोर आणत अनेक दावे केले आहेत.

प्रणाली मोरे

The Kerala Story रिलीजच्या १३ दिवसानंतर सिनेमाच्या निर्मात्यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली. यादरम्यान त्यांनी काही महिलांना समोर आणत दावा केला की केरळमध्ये धर्मांतर झालेल्या या रिअल लाइफमधील पीडित आहेत. मात्र पुन्हा या सगळ्यांनी हिंदू धर्म स्विकारला. (The kerala Story director sudipto sen says we have done the serivce to the islam by making film)

यादरम्यान सिनेमाच्या दिग्दर्शकांनी सिनेमावर केल्या गेलेल्या आरोपांवर देखील स्पष्टिकरण दिले आहे. त्यांनी सांगितलं आहे की सिनेमा कोणत्याही धर्मावर भाष्य करत नाही. ना हिंदू धर्माविषयी ना मुसलमानांवर हा सिनेमा बोलतो.

सुदिप्तो सेन पुढे म्हणाले की, सिनेमात आम्ही तीन मुली दाखवल्या आहेत ज्या हजारो मुलींच्या दुःखाला रिप्रेझेंट करत आहेत.

सुदिप्तो सेन पुढे म्हणाले की,''मला वाटतं तुम्हाला माहित असेल की दहशतवादी कसा धर्माचा वापर करतात,ईस्लामच्या नावावर. ज्या पद्धतीने यमन आणि सीरियामध्ये इ्स्लामला तोडलं जात आहे ,त्याचा चुकीचा वापर केला जात आहे..आणि हे सांगण्यासाठी मला केरळचं उदाहरण देण्याची गरज नाही''.

या दरम्यान सुदिप्तो सेन म्हणाले,''लोकांना मला हे सांगावंस वाटत आहे की तुमच्या ईस्लाम धर्माचा चुकीचा वापर केला जात आहे,मला वाटतं मी हा सिनेमा काढून एक प्रकारे मग ईस्लाम धर्माची सेवा केली आहे''.

सेन यांनी दावा केला आहे की केरळच्या एका २० वर्षाच्या मुलीनं त्यांची सोशल मीडियावर माफी मागितली. त्यांनी दावा केला की त्या मुलीनं सिनेमा पाहिल्यानंतर त्यांना आधी शिव्या दिल्या होत्या त्यासाठी नंतर माफी मागितली

सुदिप्तो सेन म्हणाले की,''आम्ही इथे उगाचच कुठला बॅलन्स साधण्यासाठी आलेलो नाही कि ज्या अंतर्गत आम्ही थोडं हिंदूंना चांगलं दाखवू आणि थोडं मुसलमानांना चांगलं दाखवू. हा आमचा सिनेमा नव्हता. जे घडलं तेच आम्ही सिनेमाच्या कथेतून दाखवलं. सिनेमातील प्रत्येक शब्द,प्रत्येक चित्र सत्य आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकरी कर्जमाफीसाठी बॅंकांची माहिती तयार! ३० जून ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतच्या थकबाकीदारांचा समावेश; नियमित कर्जदारांना मिळणार ‘हा’ लाभ

Yogi Adityanath : औरंगजेबाची मोठी घोडचूक काय होती? वीर बाल दिवसानिमित्त योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल!

आजचे राशिभविष्य - 28 डिसेंबर 2025

Panchang 28 December 2025: आजच्या दिवशी मंजिष्ठ, केशर किंवा रक्तचंदन पाण्यात टाकून स्नान करावे

Winter Special Recipe: हिवाळ्याची खास चव! शेंगाचा सिझन संपायच्या आधी सोल्याचे कढिगोळे नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT