the kerala story  sakal
मनोरंजन

बंदीची मागणी होत असतांनाच 'द केरळ स्टोरी' ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज! कुठे अन् कधी पाहता येणार चित्रपट

Vaishali Patil

'द केरळ स्टोरी' या चित्रपटाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कमाईचा आकडा पाहता या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी देशभरातून १६.५० कोटींची कमाई केली आहे. द केरळ स्टोरीनं आतापर्यत ३५.७५ कोटींची कमाई केली आहे.

या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सातत्याने होत आहे केली जात आहे. तर तामिळनाडूमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. मात्र चित्रपटाचा प्रतिसाद पाहता हा चित्रपट आणखी काही दिवसात कमाईचे नवीन विक्रम करेल असं काहीस चित्र बॉक्स ऑफिसवर दिसत आहे.

चित्रपट प्रदर्शित होऊन फक्त चार दिवस झाले आहे. त्यामुळे, त्याच्या OTT प्रीमियरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तरी या चित्रपटाची OTT प्रीमियरची तारीख सध्या माहीत नाही. तरी देखील हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर दिड महिन्यांनंतर ओटीटीवर प्रदर्शित होणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

त्यानुसार हा चित्रपट साधारण जूनच्या तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला पाहता येवु शकेल असा अंदाज आहे. चित्रपटाचे स्ट्रीमिंग अधिकार ZEE5 ने आणले आहेत, अशी माहिती समोर आली आहे आणि एकदा तो स्ट्रीमिंगसाठी तयार झाल्यावर तो प्लॅटफॉर्मवर पाहिला जाऊ शकतो. असा दावाही करण्यात येत आहे.

अदा शर्मा स्टारर आणि विपुल शाह निर्मित आणि सुदिप्तो सेनद्वारा दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाची सर्वत्रच जोरदार चर्चा झाली सुरु आहे. 5 मे ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला रिलिज होऊन तीन दिवस झाले असले तरी यावरुन सुरु झालेला वाद काही शांत होण्याचं नाव घेत नाही आहे. केवळ मनोरजंन विश्वच नाही तर राजकिय विश्वातही वातावरण चांगलचं तापलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT