The Kerala Story Banned esakal
मनोरंजन

The Kerala Story Banned : 'द केरळ स्टोरी'वर बंदी? सर्वोच्च न्यायालयात आता... !

द केरळ स्टोरी चित्रपटावरुन सुरु झालेल्या वादाचे पडसाद आता सर्वोच्च न्यायालयापर्यत जाऊन पोहचले आहे.

सकाळ डिजिटल टीम

The Kerala Story movie petitioners reached supreme court : द केरळ स्टोरी चित्रपटावरुन सुरु झालेल्या वादाचे पडसाद आता सर्वोच्च न्यायालयापर्यत जाऊन पोहचले आहे. खरं तर यापूर्वी देखील या चित्रपटाच्या ट्रेलरवरुन एकानं कोर्टात याचिका दाखल केली होती. ती याचिका कोर्टानं फेटाळूनही लावली होती. मात्र आता या चित्रपटावरच बंदी घातली जाणार का अशाप्रकारची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

५ मे रोजी प्रदर्शित झालेल्या द केरळ स्टोरीवरुन वेगळ्या प्रकारची चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियावर देखील या चित्रपटावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहे. प्रतिक्रिया देण्यात बॉलीवूडचे दिग्गज सेलिब्रेटी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांची संख्या मोठी आहे. अशातच कोर्टापर्यत द केरळ स्टोरीचा वाद गेल्यानं निर्माते, दिग्दर्शक यांची चिंता वाढली आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

केरळ स्टोरी चित्रपटाच्या स्क्रिनिंगबाबत एकानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेबाबत चर्चा होऊ लागली आहे. त्यावरील सुनावणी ही येत्या पंधरा मे रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. केरळ स्टोरीवरुन केरळमधील राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. अशातच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. केरळ कोर्टानं चित्रपटावरुन जो आदेश दिला होता त्याच्याविरोधात याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल म्हणाले की, हा वाद केरळ स्टोरी या चित्रपटाशी संबंधित आहे. केरळ कोर्टानं या चित्रपटाच्या प्रदर्शनावरील बंदीचा आदेश फेटाळून लावला आहे. त्याच्याविरोधात आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यावर १५ मे रोजी सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT