The Kerala Story Movie Vivek Agnihotri  esakal
मनोरंजन

The Kerala Story : भारतात 'द केरळ स्टोरी' बनवणं सोपं नाही! काश्मिर फाईल्सच्या अग्निहोत्रींकडून कौतूक

चित्रपट निर्माता विवेक अग्निहोत्री हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

The Kerala Story Movie Vivek Agnihotri the kashmir files : चित्रपट निर्माता विवेक अग्निहोत्री हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असल्याचे दिसून आले आहे. अग्निहोत्रींच्या द काश्मिर फाईल्सनं बॉक्स ऑफिसवर कमाल केल्याचे दिसून आले. दोनशे कोटींहून अधिक बिझनेस या चित्रपटानं केलं. याशिवाय देशातील समाजकारण, राजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्र देखील या चित्रपटानं ढवळून काढल्याचे दिसून आले.

काश्मिर फाईल्सनंतर आता सुदिप्तो सेन आणि विपुल अमृतलाल शहा यांच्या द केरळ स्टोरीची चर्चा आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची चर्चाही सोशल मीडियावर होत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होताना दिसतो आहे. दोन दिवसांत या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. लव जिहाद सारख्या वेगळ्या विषयावर चित्रपटाची निर्मिती करत सेन यांनी प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडले आहे. त्याच्यावर टीकाही करण्यात आली आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

द केरळ स्टोरीच्या निर्मात्यांवर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारुन भंडावून सोडले आहे. याशिवाय प्रोपगंडा चित्रपटाची निर्मिती करुन तुम्ही काय साध्य करणार आहात असा प्रश्नही नेटकऱ्यांनी त्यांना विचारला आहे. अशातच अग्निहोत्री यांनी निर्माता आणि दिग्दर्शक यांची बाजू घेत त्यांना दिलासा दिला आहे. त्यांना अशा परिस्थितीत काय विचार करावा आणि कोणत्या प्रकारे निर्णय घेण्याची गरज आहे याविषयी सांगितले आहे.

फिल्ममेकर अग्निहोत्री द केरळ स्टोरीच्या समर्थनार्थ एक टविट केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, तुमच्या कलाकृतीसाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. एका वेगळ्या विषयावर चित्रपट तयार करण्याचे धाडस तुम्ही दाखवले. या चित्रपटानंतर तुमचे पूर्ण आयुष्य बदलून जाईल. याचे भान ठेवा. तुम्ही धाडसी प्रयत्न केला आहे. तेव्हा त्याची किंमत चुकवण्याची तयारीही ठेवा.

तुम्हाला लोकांची नाराजी ओढावून घ्यावी लागेल. तुम्हाला खूप अस्वस्थ वाटू लागेल. काहीवेळेला तुम्ही कमालीचे निराशही व्हाल. पण घाबरु नका. तुम्ही जे काही केले आहे त्यावर विश्वास ठेवा. सगळे काही चांगले होईल. आधुनिक काळात चित्रपटांच्या हातात खूप काही आहे. ज्या गोष्टी राजकारणी करु शकत नाही त्याच चित्रपटांनी साध्य होऊ शकतात. तेव्हा तुमही तुमच्या भूमिकेवर ठाम राहण्याची गरज आहे. असेही अग्निहोत्री यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

SCROLL FOR NEXT