The Kerala Story SC  Esakal
मनोरंजन

The Kerala Story : ममता दीदींच्या बंगालमध्ये 'केरळ स्टोरी'च्या प्रदर्शनाला अखेर हिरवा कंदील!

सुदीप्तो सेन दिग्दर्शित द केरळ स्टोरीला देशातील दोन राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली होती. त्यांच्या स्क्रिनिंगला विरोध करण्यात आला होता.

सकाळ डिजिटल टीम

The Kerala Story Supreme Court stays the May 8 order : सुदीप्तो सेन दिग्दर्शित द केरळ स्टोरीला देशातील दोन राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली होती. त्यांच्या स्क्रिनिंगला विरोध करण्यात आला होता. यामध्ये पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश होता. अखेर सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार पश्चिम बंगालमध्ये द केरळ स्टोरी प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पश्चिम बंगाल सरकारकडून केरळ स्टोरीच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. त्याविरोधात मेकर्सनं सर्वोच्च न्यायालयात धावही घेतली होती. अखेर पश्चिम बंगालच्या त्या याचिकेवर कोर्टानं स्थगिती दिल्यानं पश्चिम बंगालमध्ये द केरळ स्टोरी प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरीनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावरुन वेगवेगळ्या चर्चेला उधाणही आले होते. हा चित्रपट एका समुहावर, धर्मावर टीका करतो असा त्याचा प्रचार करण्यात आला. यामुळे चित्रपटातील कलावंतांनी त्याविरोधात मुलाखतींमध्ये ज्यांनी टीका केली त्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रीम कोर्टानं यापूर्वी तामिळनाडू आणि पश्चिम बंगालला तुम्ही द केरळ स्टोरीवर बंदी का घातली असा प्रश्न विचारला होता. त्यांच्याकडून लेखी उत्तरही मागवले होते. यात तामिळनाडू सरकारनं हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दीच नसल्यानं आपण हा चित्रपट सुरु ठेवला नाही. असे म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तासंघर्षात ८४.२५ टक्के मतदान! २३ हजार ३९३ सभासदांचा कौल; ८३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद, आज निकाल

AI Farming: ‘एआय’तंत्राच्या मदतीने थोपविला दुष्काळ!तटबोरगावच्या शेतकऱ्याने वाचवला १५ एकर ऊस, पाण्याचीही बचत

SCROLL FOR NEXT