the kerala story box office collection  sakal
मनोरंजन

The Kerala Story : महाराष्ट्रातही 'द केरळ स्टोरी टॅक्स फ्री' करा! मध्यप्रदेशात चित्रपट पाहण्यासाठी खास...

यापूर्वी महाराष्ट्रातील भाजपच्या काही संघटनांनी केरळ स्टोरी टॅक्स फ्री व्हावा म्हणून निवेदन दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

The Kerala Story Tax-free : सध्याच्या घडीला द केरळ स्टोरी चित्रपटावरुन मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे. लव जिहाद सारख्या वेगळ्या मुद्याला स्पर्श करत हा चित्रपट हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मांतील काही गोष्टींवर प्रकाशही टाकतो. द केरळ स्टोरी प्रदर्शित झाल्यानंतर मनोरंजन विश्वात तर खळबळ उडालेली दिसते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील द केरळ स्टोरीवरुन प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी देशामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्याचे प्रतिबिंब या चित्रपटातून उमटत असल्याचे दिसून आले आहे. असे म्हटले आहे. यानंतर राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून या चित्रपटावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहे. द काश्मिर फाईल्सनंतर सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा होणाऱ्या चित्रपटांमध्ये केरळ स्टोरीचे नाव घ्यावे लागेल.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

काश्मिर फाईल्स हा देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये टॅक्स फ्री करण्यात आला होता. त्यानंतर आता द केरळ स्टोरी हा चित्रपट देखील टॅक्स फ्री करण्यात यावा अशी मागणी काही संघटनांकडून केली जात आहे. मध्यप्रदेशात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातही तो टॅक्स फ्री करण्यात यावा अशी मागणी होताना दिसत आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील भाजपच्या काही संघटनांनी केरळ स्टोरी टॅक्स फ्री व्हावा म्हणून निवेदन दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

नाशिकच्या हिंदू सकल समाजाच्यावतीनं केरळ स्टोरी टॅक्स फ्री करण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली आहे. हिंदू सकल समाजाच्यावतीनं राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये लव जिहादच्या विरोधात आंदोलनं करुन सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदू समाजातील मुलींमध्ये सजगता येईल. त्यांना अनेक गोष्टी कळतील. यासाठी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा. असे निवेदनात म्हटले गेले आहे.

द केरळ स्टोरी हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी दिग्दर्शित केला असून त्याची निर्मिती विपुल शहा यांनी केली आहे. त्यामध्ये अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इडनानी आणि सोनिया बलानी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आशियाई विजेत्या भारतीय तिरंदाजांची अवहेलना; १० तास विमानतळावर अडकले; अस्वच्छ धर्मशाळेत वास्तव्य...

Grain Scam:'शासकीय धान्याचा ८७ लाखांचा अपहार'; फलटण तालुक्यातील धक्कादायक प्रकार, सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ..

मोठी बातमी! शैक्षणिक सहलींसाठी विद्यार्थ्यांसाठी सहलीत ५० टक्के सवलत; प्रत्येकास १० लाखांचा अपघात विमाही; एसटी महामंडळाचे आगारप्रमुख जाणार शाळांमध्ये

आजचे राशिभविष्य - 19 नोव्हेंबर 2025

Horoscope Prediction : आज तयार होतोय अमला राजयोग; मेष आणि या पाच राशींच्या आर्थिक अडचणींना लागणार पूर्णविराम !

SCROLL FOR NEXT