The producer of The Kashmir Files will donate 10 thousand tickets of Adipurush, Prabhas thanked  SAKAL
मनोरंजन

The Kashmir Files चे निर्माते Adipurush ची १० हजार तिकीटे करणार दान, प्रभासने मानले आभार

अभिषेक अग्रवालच्या या मोठ्या कृतीवर प्रभासची प्रतिक्रियाही समोर आली आहे

Devendra Jadhav

Adipurush Movie News Update: आदिपुरुष सिनेमाची सध्या भारत नव्हे तर जगभरात हवा आहे. आदिपुरुष पाहण्यासाठी तमाम प्रेक्षक उत्सुक आहेत. आदिपुरुषचे मेकर्स आणि निर्माते सिनेमा जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

अशातच आदिपुरुष सिनेमासंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. ती म्हणजे The Kashmir Files चे निर्माते आदिपुरुषची तब्बल १० हजार तिकिटं दान करणार आहेत.

(The producer of The Kashmir Files will donate 10 thousand tickets of Adipurush, Prabhas thanked)

The Kashmir Files आणि Karthikey 2 चे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी बुधवारी जाहीर केले की ते प्रभासच्या 'आदिपुरुष'ची 10,000 तिकिटे दान करणार आहेत. याबाबत त्यांनी ट्विटरवर अधिकृत पोस्टही केली आहे.

ते लिहितात, "हा 'आदिपुरुष' साजरा करण्याचा प्रसंग आहे. श्रीरामावरील माझी भक्ती आणि श्रद्धा यामुळे मी 'आदिपुरुष'साठी 10,000 तिकिटे विकत घेण्याचे ठरवले आहे आणि ते तेलंगणातील सरकारी शाळा, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांना दान करायचे आहे.

जर तुम्हाला तिकिटे मिळवायची असतील तर कृपया खाली दिलेला फॉर्म भरा." अशी पोस्ट त्यांनी लिहिलीय.

अभिषेक अग्रवालच्या या मोठ्या कृतीवर प्रभासची प्रतिक्रियाही समोर आली आहे. प्रभासने लिहिले, 'सर, हे खरोखरच कौतुकास्पद पाऊल आहे.'

त्याचवेळी सर्व फॅन्सनी सुद्धा अभिषेक अग्रवालला पाठिंबा दिला. एकूणच आदिपुरुषची सध्या सगळीकडे प्रचंड क्रेझ आहे.

अनेक बडे बडे राजकारणी आपल्या परीने सिनेमा प्रमोट करण्यास उत्सुक आहेत. The Kashmir Files आणि Karthikey 2 चे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी उचललेलं पाऊल निश्चित कौतुकास्पद आहे.

प्रत्येक थिएटरमध्ये एक जागा हनुमानासाठी:

आदिपुरुष प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधी एक मोठी घोषणा करण्यात आलीय. आदिपुरुष चित्रपटगृहात जिथे चित्रपट प्रदर्शित होत आहे तिथे एक सीट राखीव ठेवण्यात येईल असे ठरवण्यात आले आहे. म्हणजे संपूर्ण शो दरम्यान एक जागा रिकामी असेल.

अशी श्रद्धा आहे की, जिथे रामायणाचा उल्लेख आहे तिथे हनुमानाचा वास असतो. या विश्वासाला पाठिंबा देत निर्मात्यांनी प्रत्येक चित्रपटगृहात बजरंगबलीच्या नावाने एक जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मात्यांना त्यांचा चित्रपट भगवान हनुमानांसमोर प्रदर्शित करायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमधील गँगस्टर करनजीत गुग्गाला दिल्लीत अटक

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT