The Railway Men Teaser Release: Esakal
मनोरंजन

The Railway Men: भोपाळ वायू दुर्घटनेची ती काळ रात्र! 'द रेल्वे मॅन' चा श्वास रोखणारा टिझर रिलीज

The Railway Men Teaser Release: भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित 'द रेल्वे मेन'चा टिझर रिलीज

Vaishali Patil

The Railway Men Teaser Release: मनोरंजन विश्वात सध्या सत्य घटनेवर चित्रपट बनवण्याकडे जास्त कल दिला जात आहे. काही दिवसांपुर्वीच अक्षय कुमारचा मिशन राणीगंज हा सिनेमा देखील सत्य घटनेवरच आधारित होता. आता त्यातच आणखी एका सत्य घटनेवर आधारित वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याचा टिझर निर्मात्यांनी शेयर केला आहे.

2 डिसेंबर 1984 हा भोपाळसाठीच नव्हे तर संपुर्ण जगासाठी भयानक दिवस होता. या दिवशी भोपाळमधील रासायनिक कारखान्यातून विषारी वायूची गळती झाली. ज्यामुळे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक लोक बाधित झाले. ही दुर्घटना जगातील सर्वात मोठ्या औद्योगिक आपत्तींपैकी एक आहे. आता याच घटनेवर वेब सिरीज तयार करण्यात येत आहे जिचे नाव आहे 'द रेल्वे मेन' .

'द रेल्वे मेन' ही वेब सिरीज यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली तयार करण्यात आली आहे. या वेबसिरिजमध्ये आर. माधवन, केके मेनन, बाबिल खान आणि दिव्येंदू मुख्य भूमिकेत आहेत. आज या वेबसिरिजचा चित्तथरारक टिझर रिलिज करण्यात आला. जो पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल.

द रेल्वे मॅनच्या टीझरची सुरुवात मध्यरात्री कारखान्यातून गॅस गळतीने होते. "अपघात झाला आहे, मोठा अपघात झाला आहे" असा आवाज ऐकू येतो. जुन्या भोपाळमधील रासायनिक कारखान्यातून गॅस गळती झाल्याचे कळते.

या दुषित प्राणघातक वायुमुळे लोकांचा श्वास गुदमरतो. त्या क्षणी भोपाळ जंक्शन नकाशावरून गायब झाले आहे. असे सांगण्यात येते. टिझरमध्ये असे अनेक सीन आहेत जे पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येतो.

गॅस गळतीमुळे त्रस्त झालेल्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी अनेक जण आले आणि त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांना वाचवले. 'द रेल्वे मेन' ही कहाणी अशाच हिरोंची कहाणी सांगते.

या मालिकेत आर. माधवन मध्य रेल्वेचे जीएम रती पांडे यांच्या भुमिकेत आहे तर केके मेनन स्टेशन मास्टर, बाबिल खान लोको पायलट आणि दिव्येंदू कॉन्स्टेबलची भुमिका साकारत आहे. हे चौघे मिळून भोपाळच्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना शहराबाहेर पाठवण्याची योजना आखतात.

राहुल रवैलचा मुलगा शिव रवैल या सिरिजद्वारे त्याच्या दिग्दर्शनाची कारकीर्द सुरू करत आहे. 'द रेल्वे मेन' ही वेबसिरिज 18 नोव्हेंबर 2023 रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. या सिरिजचे चार भाग असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

Udgir Gutkha Seized : पाठलाग करून साडेदहा लाखांचा गुटखा पकडला; एक चारचाकी तर एक आरोपी ताब्यात

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Yermala News : कलाकेंद्र चालकाचा नियमांचा भंग; महाकाली कला केंद्राबाबत जिल्हाधिकारी यांचा मोठा निर्णय

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT