'The Sandlot' star Marty York's mother found dead at her California home, suspect arrested  SAKAL
मनोरंजन

Marty York: सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याच्या आईची राहत्या घरी हत्या, उडाली एकच खळबळ

सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याच्या आईची हत्या झाल्याने सर्वांना धक्का बसलाय

Devendra Jadhav

"द सँडलॉट" स्टार मार्टी यॉर्कची आई, डेल नॉर्टे काउंटी शेरीफ डेप्युटी डिआना इस्माईल, गुरुवारी सकाळी कॅलिफोर्नियाच्या क्रिसेंट सिटीमधील नॉर्थ बँक रोडवरील तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली, विभागाने शुक्रवारी फेसबुकवर जाहीर केले.

डिआना यांच्या खूनाचा तपास केला जात आहे. याशिवाय पोलिसांनी एक अलर्ट जारी केला असून संशयिताचा शोध घेतला. यातील मुख्य आरोपीला अटक ताब्यात घेण्यात आले आहे.

('The Sandlot' star Marty York's mother found dead at her California home, suspect arrested)

डिआना यांचा प्रियकर डॅनियल जेम्स वॉल्टर या प्रकरणात मुख्य संशयित होता. हा प्रियकर कायदेशीररित्या त्याचे नाव बदलून एडवर्ड पॅट्रिक डेव्हिस नावाने सगळीकडे फिरत होता. डेल नॉर्टे काउंटी शेरीफ कार्यालयाने शुक्रवारी संध्याकाळी वॉल्टरला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

अभिनेता यॉर्कने शुक्रवारी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याच्या आईच्या मृत्यूची पुष्टी केली.

"मला लिहिण्यासाठी खूप कठीण जातंय परंतु मला काल रात्री शेरीफ विभागातून कळले की माझ्या आईची हत्या झाली. ती ज्या माणसाला ओळखत होती त्यानेच तिची हत्या केल्याचं तिने सांगितलं"

तो पुढे म्हणाला, "माझ्या मनात सध्या राग, सूड, रडणे या दरम्यान अशा भयंकर भावना आहेत. माझ्या आईच्या हल्लेखोराचा शोध सुरू आहे, जर तुम्ही या माणसाला पाहिले असेल तर ताबडतोब अधिकाऱ्यांशी संपर्क साधा!" अशी पोस्ट यॉर्कने लिहीली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT