The Tashkent Files who killed shastri how vivek agnihotri research on this film sakal
मनोरंजन

Lal Bahadur Shastri: लाल बहादूर शास्त्रींची हत्या की?.. विवेक अग्नीहोत्रींनी असा घेतला शोध..

आज लाल बहादूर शास्त्री यांचा स्मृती दिन.. त्यानिमित्ताने जाणून घेऊया ही खास बात..

सकाळ डिजिटल टीम

आज ताश्कंद कराराला ५७ वर्ष पूर्ण झाली आहेत. १० जानेवारी १९६६ रोजी हा शांतता करार भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये केला गेला. हा करार झाला ते ठिकाण होते ताश्कंद. १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धात पाकिस्तानचा सपशेल पराभव दिसत असताना पाकिस्तानने इतर देशांच्या मध्यस्थीने हा करार करण्याचा प्रस्ताव मांडला.भारत सरकारच्या तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी या करारावर सही केली होती. हा करार झाल्यानंतर पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचं अकस्मात निधन झाले होते. याच प्रकरणावर आधारित द ताश्कंद फाईल्स हा सिनेमा २०१९ ला रिलीज झालेला. द काश्मीर फाईल्स फेम विवेक अग्निहोत्री यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केलेला. (The Tashkent Files who killed shastri how vivek agnihotri research on this film)

द ताश्कंद फाईल्स सिनेमाची घोषणा झाली २०१८ ला. भारतातील पहिला "क्राऊड-सोर्स्ड" थ्रिलर म्हणून हा सिनेमा ओळखला गेला. या सिनेमाच्या दिग्दर्शक - निर्मात्यांनी सिनेमाचं शूटिंग सुरु करण्याआधी म्हणजेच फेब्रुवारी २०१८ ला एक महत्वाची गोष्ट केली. ताश्कंदमधील लाल बहादूर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूशी संबंधित कोणतीही माहिती, पुस्तक, एखादी लिंक किंवा आठवणी लोकांकडे असल्यास त्यांनी पुढे येऊन सांगण्याचे आवाहन करण्यात आले. यामागचे मुख्य कारण म्हणजे सिनेमाच्या कथेला एक आकार मिळेल. याशिवाय भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या अकस्मात निधनाचे गूढ कोडे सोडवण्यात मदत होईल. या सिनेमासाठी अनेक राजकीय पुस्तकांचा आधार घेण्यात आला.

(lal bahadur shastri)

शूटिंग पूर्ण झाल्यावर द ताश्कंद फाईल्स १२ एप्रिल २०१९ ला प्रदर्शित झाला. सिनेमात नसिरुद्दीन शाह, मिथुन चक्रवर्ती, श्वेता बसू प्रसाद, पंकज त्रिपाठी, पल्लवी जोशी असे दिग्गज कलाकार सिनेमात होते. समीक्षक आणि प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया सिनेमाला मिळाल्या.

या सिनेमानंतर विवेक अग्निहोत्री यांनी द काश्मीर फाइल्स हा सिनेमा दिग्दर्शित केला. २०२२ मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा विविध कारणांमुळे चर्चेत राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT