the vaccine war director vivek agnihotri meet cm yogi adityanath SAKAL
मनोरंजन

The Vaccine War: विवेक अग्निहोत्रींनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट, विद्यार्थ्यांना द व्हॅक्सीन वॉर पाहण्याचे आवाहन

द व्हॅक्सीन वॉर सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली

Devendra Jadhav

The Vaccine War News: 'द व्हॅक्सिन वॉर'चे सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सिनेमाचं प्रमोशन करताना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना विशेष विनंतीही केली.

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी झालेल्या भेटीची माहिती स्वत: विवेक अग्निहोत्रींनी शेअर केली आहे.

ANI ला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, विवेक अग्निहोत्रींनी त्यांच्या चित्रपटाबद्दल सांगितले आणि सांगितले की, "उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत आमची छान भेट झाली. विज्ञान हेच ​​भविष्य असल्याचे ते म्हणाले. याशिवाय उत्तर प्रदेश राज्यातील विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवावा, अशी विनंतीही त्यांनी केली."

विवेक अग्निहोत्री यांनी ANI ला पुढे सांगितले की, 'कोविड महामारीच्या काळात आपण जगू की नाही ही लढाई होती. स्वतःचा देश विकू पाहणाऱ्या लोकांचा एक मोठा गट होता. ते परदेशी लस आणण्यास सांगत होते आणि त्यांना विश्वास होता की भारत हे करू शकत नाही.

पण अशा भयंकर परिस्थितीत आपल्या काही शास्त्रज्ञांनी आपला जीव धोक्यात घालून आपण ही असाध्य गोष्ट साध्या करू शकतो असा विश्वास होता. त्यांनी 130 कोटी लोकांचे प्राण तर वाचवलेच पण 101 देशांमध्ये त्यांची लस पाठवून गरजू लोकांचे प्राणही वाचवले. यामागे प्रामुख्याने आमच्या महिला वैज्ञानिक होत्या."

विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या X खात्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीचा फोटो शेअर केला आणि लिहिले, 'माननीय योगी आदित्यनाथ जी, तुमचे प्रेरणादायी शब्द आणि द व्हॅक्सीन वॉरचे कौतुक केल्याबद्दल धन्यवाद. यूपीच्या अभूतपूर्व विकासात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासावर तुमचा भर आहे हे जाणून मला आनंद झाला."

'द व्हॅक्सिन वॉर' सिनेमा सध्या चित्रपटगृहांमध्ये सुरु आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, अनुपम खेर, गिरीजा ओक यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT