The Great Indian Family Teaser Esakal
मनोरंजन

The Great Indian Family: सारानंतर आता विकी करणार मिस वर्ल्डसोबत रोमान्स! "द ग्रेट इंडियन फॅमिली" येतोय भेटीला..

Vaishali Patil

The Great Indian Family: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान यांचा 'जरा हटके जरा बचके' हा सिनेमा यावर्षी रिलिज झाला ज्याला प्रेक्षकांनी खुप चांगला प्रतिसाद दिला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. प्रेक्षकांनी सारा आणि विकीच्या जोडीला डोक्यावर घेतलं. आता विकी कौशल पुन्हा एक धमाका करण्यासाठी सज्ज आहे.

'जरा हटके जरा बचके' नंतर आता विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा सिनेमा प्रेक्षकांना लोटपोट करण्यासाठी येत आहे. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित हा चित्रपट 22 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटात विकी कौशल आणि मानुषी छिल्लर यांची नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीज डेटसोबतच एक मजेदार व्हिडिओ देखील शेयर केला आहे.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर 'पठाण' नंतर YRF आता 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. आता या चित्रपटाचा व्हिडिओ शेयर करत निर्मात्यांनी या सिनेमाचा ट्रेलर बुधवारी प्रेक्षकांच्या भेटीला असल्याचे सांगितले आहे.

YRF ने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर चित्रपटाचा प्रोमो शेअर केला आहे. त्यात लिहिलं की, 'दिल थाम के हो जाओ तयार...मारे एंट्री- भजन कुमार. रिमाइंडर सेट करा उद्या येतोय.'

विकी कौशल आणि मानुषी छिल्लरसोबत या चित्रपटात मनोज पाहवा, कुमुद मिश्रा, सादिया सिद्दीकी, अलका अमीन आणि सृष्टी दीक्षित यांच्याही महत्वाच्या भुमिका आहेत.

विकी कौशल हा नेहमीच वेगळ्या धाटणीचे चित्रपट करण्यासाठी ओळखला जातो. त्याने अनेक सिनेमांतुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ज्यात उरी, मसान, राझी, संजू, सरदार उधम, मनमर्जियां, जरा हटके जरा बचके यांसारख्या चित्रपटांचा सामावेश आहे. आता त्याच्या द ग्रेट इंडियन फैमिली या चित्रपटाची चाहत्यांमध्ये चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT