actress urmila matondkar urge to people
actress urmila matondkar urge to people  Team esakal
मनोरंजन

"मादक दिसण्यासाठी कुठलाही 'गरम मसाला' नाही, टॅलेंट गरजेचं"

सुधीर काकडे

अभिनय क्षेत्रापासून (Bollywood) ते राजकारणापर्यंत (Politics) आपल्या कामाच्या माध्यमातून ओळख निर्माण करणाऱ्या उर्मिला मातोंडकरकडे (Urmila Matondkar) एक यशस्वी व्यक्तीमत्व म्हणून पाहिलं जातं. 1990 च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी ती एक होती. आपल्या कारकिर्दीत अनेक चांगले चित्रपट तिने केले आहेत. सध्या उर्मिला मातोंडकर एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. एका मुलाखतीत उर्मिला मातोंडकरने स्फोटक विधान केलंय. अभिनय आणि सेक्स अपीलबद्दल तिने आपलं मत मांडलं आहे.

उर्मिला मातोंडकरने एका मुलाखतीत सांगितले की, सेक्सी दिसण्यासाठी अभिनयाचीही गरज असते. केवळ मादक दृश्यं दाखवून ते करणं याला अभिनय म्हणत नाही. रंगीला हिट झाल्यानंतरही समीक्षकांनी त्याबद्दल वाईट लिहिलंय. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला मातोंडकर म्हणाली, 'रंगीलानंतर लोकांनी सांगितलं की, मी जे काही केलं ते सेक्स अपील होतं आणि त्याचा अभिनयाशी काहीही संबंध नव्हता.

उर्मिला पुढे म्हणाली की, 'हाय रामा' सारखं गाणं कलाकाराशिवाय कसं होऊ शकतं? रडणे हाच फक्त अभिनय आहे का? सेक्सी दिसणं हा देखील अभिनयाचाच एक भाग आहे. चित्रपटात काहीच नाही. चित्रपटाच्या प्रत्येक गाण्यासोबत माझी व्यक्तिरेखा बदलते, हे समीक्षकांना समजू शकलेलं नाही. उर्मिलानं सांगितले की रंगीला खूप हिट होता, पण त्याबद्दल एकही चांगला शब्द लिहिला गेलेला नाही. 'सगळं श्रेय माझे कपडे आणि हेअरस्टाइलला दिलं गेलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT