this actor played the role of union minister nitin gadkari in gadkari movie  SAKAL
मनोरंजन

Gadkari Movie: हा अभिनेता साकारणार नितीन गडकरींची भूमिका, नवीन पोस्टरमधून झाला खुलासा

अखेर गडकरी सिनेमात नितीन गडकरींची भूमिका कोण साकारणार याचा खुलासा झालाय

Devendra Jadhav

Gadkari Marathi Movie News: गडकरी मराठी सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. सिनेमात नितीन गडकरींची भूमिका कोण साकारणार हे मात्र अनेक दिवसांपासून गुलदस्त्यात होतं. अशातच गडकरी सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर आलीय.

सिनेमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भूमिका कोण साकारणार याचा खुलासा झालाय. कोण आहे हा कलाकार? जाणून घ्या सविस्तर.

(this actor played the role of union minister nitin gadkari in gadkari movie)

हा कलाकार साकारणार नितीन गडकरींची भूमिका

यापूर्वी गडकरी या चित्रपटाचे पोस्टर, टिझर झळकल्यानंतर प्रेक्षकांना उत्सुकता होती ती, नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार याची. आता या चित्रपटाचे दुसरे पोस्टर झळकले असून यातील 'गडकरी' यांचा चेहरा समोर आला आहे.

नितीन गडकरी यांची भूमिका राहुल चोपडा साकारणार आहेत. तर त्यांच्या पत्नीची म्हणजेच कांचन गडकरी यांची भूमिका ऐश्वर्या डोरले साकारणार आहे.

सिनेमातले इतर कलाकार

या व्यतिरिक्त गडकरी या चित्रपटात नितीन गडकरी यांच्या मित्रांच्या भूमिकेत अभिलाष भुसारी, पुष्पक भट, अभय नवाथे, वेदांत देशमुख दिसतील तर पत्रकाराची भूमिका तृप्ती प्रमिला केळकर हिने साकारली आहे.

अशाप्रकारे गडकरी सिनेमात तगड्या कलाकारांची स्टारकास्ट दिसतेय.

या तारखेला सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार

अनुराग राजन भुसारी दिग्दर्शित 'गडकरी' हा चित्रपट येत्या २७ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 'गडकरी'ची कथा, पटकथाही अनुराग राजन भुसारी यांची असून अनुराग भुसारी, मिहिर फाटे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. राहूल चोपडा नितीन गडकरींच्या भूमिकेला नक्कीच न्याय देईल याची सर्व प्रेक्षकांना अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: रेल्वेच्या चौथ्या लाईन साठी शेतीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

SCROLL FOR NEXT