Ashok Saraf 
मनोरंजन

अशोक सराफ यांना सायली संजीव का म्हणते 'पप्पा'?

'हॅपी बर्थडे पप्पा', अशी पोस्ट सायलीने लिहिली आहे.

स्वाती वेमूल

अभिनेत्री सायली संजीव sayali sanjeev हे मराठी मालिका आणि चित्रपटविश्वातील सुपरिचित नाव. 'काहे दिया परदेस' या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सायलीचा मोठा चाहतावर्ग आहे. सायली सोशल मीडियावर सक्रिय असून अनेकदा तिचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते. नुकताच तिने विनोदसम्राट अशोक सराफ Ashok Saraf यांच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टा स्टोरीमध्ये फोटो पोस्ट केला आहे. अशोक सराफ यांच्यासोबतचा तिचा हा फोटो असून त्यावर तिने 'हॅपी बर्थडे पप्पा' असं लिहिलंय. सायलीने याआधीही अशोक सराफ यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केले, तेव्हाही कॅप्शनमध्ये त्यांचा उल्लेख 'पप्पा' असाच केला. अशोक सराफ यांना ती पप्पा का म्हणते, याचा खुलासा खुद्द तिनेच एका मुलाखतीत केला होता. (this is why actress sayali sanjeev calls ashok saraf as papa)

एका रेडिओ चॅनलच्या मुलाखतीदरम्यान चाहत्याने सायलीला यासंदर्भातील प्रश्न विचारला होता. 'तुम्ही अशोक सराफ आणि निवेदिता यांची मुलगी आहात का', असा प्रश्न विचारला असता, त्यावर सायली म्हणाली, 'तुम्ही असं समजू शकता. माझी काहीच हरकत नाही. मला याआधीही अनेकांनी हा प्रश्न विचारला होता. परंतु माझ्या वडिलांचं नाव संजीव चंद्रशेखर आणि आईचं नाव शुभांगी चंद्रशेखर आहे.' अनेकदा लोकांचा गैरसमज का होतो, यावर उत्तर देत ती पुढे म्हणाली, 'अशोक सराफ आणि निवेदिता यांना मुलगी नाही. त्यामुळे त्यांनी मला नेहमीच त्यांच्या मुलीसारखं वागवलं आहे. म्हणूनच मी त्यांना पप्पा म्हणून हाक मारते.'

सायली संजीवने 'काहे दिया परदेस' या मालिकेतून कलाविश्वात पाऊल ठेवलं. यामध्ये तिने साकारलेल्या गौरीच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून फार प्रेम मिळालं. या मालिकेतील तिचं अभिनय पाहून पुढे तिला चित्रपटांचे ऑफर्स येऊ लागले. सायली सध्या 'शुभमंगल ऑनलाइन' या मालिकेत अभिनेता सुयश टिळकसोबत मुख्य भूमिका साकारत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT