the family man 2 
मनोरंजन

'The Family Man 2'ला ट्विटरवर होतोय विरोध, कारण..

#ShameOnYouSamantha हॅशटॅग होतोय ट्रेंड

स्वाती वेमूल

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय वेब सीरिज 'द फॅमिली मॅन २'चा The Family Man 2 ट्रेलर बुधवारी (१९ मे) प्रदर्शित झाला. मात्र आता या सीरिजला नेटकऱ्यांचा जोरदार विरोध होत आहे. यामध्ये तमिळनाडूची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखविल्याचा आरोप काही नेटकऱ्यांकडून होत आहे. 'द फॅमिली मॅन २' ही सीरिज तमिळविरोधी असल्याचं त्यांनी म्हटलंय. या सीरिजमध्ये मनोज वाजपेयी Manoj Bajpayee आणि समंथा अक्कीनेनी Samantha Akkineni यांच्या मुख्य भूमिका आहेत. या दोन्ही कलाकारांचा सोशल मीडियावर तीव्र विरोध केला जात आहे. इतकंच नव्हे तर याचे दिग्दर्शक राज आणि डीके यांनी जाहीररित्या माफी मागावी, अशीही मागणी केली जात आहे. (this is why The Family Man 2 facing severe backlash on Twitter)

'द फॅमिली मॅन २'च्या विरोधात आक्षेप नोंदवणाऱ्यांच्या मते, समंथाची भूमिका दहशतवादी म्हणून दाखविण्यात आली आहे आणि त्यामुळे तमिळ समुदायाला दहशतवादी म्हणून दाखवलं जातं आहे. समंथा साकारत असलेलं पात्र एथनिक तमिळ लोकांच्या स्वतंत्र राज्यासाठी लढत असल्याचं दिसत आहेत. श्रीलंका सैन्य आणि बंडखोर लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ एलाम (एलटीटीई) यांच्यामध्ये १९८३ मध्ये झालेल्या संघर्षाची त्याला पार्श्वभूमी आहे.

या संपूर्ण वादावर सीरिजच्या निर्मात्यांनी अद्याप कोणतंच स्पष्टीकरण दिलेलं नाही. 'द फॅमिली मॅन'चा पहिला सिझन २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे तो पुढे ढकलण्यात आला. येत्या ४ जून रोजी ही सीरिज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये मनोज वाजपेयी, समंथा अक्किनेनी यांच्यासोबतच सीमा बिस्वास, शरद केळकर, दर्शन कुमार, सनी हिंदुजा, शहाब अली, श्रेया धन्वंतरी, महेक ठाकू आणि वेदांत सिन्हा यांच्या महत्त्वूपूर्ण भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas: ''माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही'', 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'च्या आरोपावर सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

एक नायक तर दुसरी खलनायिका; टीव्हीचे गाजलेले चेहरे पुन्हा भेटीला येणार; कोण आहेत ते? प्रेक्षकांनी सांगितली नावं

Jalgaon News : खेळता खेळता हरवला जीव! जळगावात १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Electricity Supply: अदानी हटाव..., प्रीपेड मीटरला ग्राहकांचा नकार; महावितरण खाजगीकरणाविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune Market Committee : संचालक मंडळ बरखास्त करून ईडी व इन्कम टॅक्स चौकशी करा; राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष विकास लवांडे यांची मागणी

SCROLL FOR NEXT