This Marathi actor will appear in Ranbir's 'Shamshera' movie  sakal
मनोरंजन

रणबीरच्या 'शमशेरा'मध्ये दिसणार 'हा' मराठी अभिनेता.. सध्या मालिका गाजवतोय..

स्टार प्रवाह वरील एका गाजलेल्या मालिकेतील प्रमुख कलाकार आता बॉलीवुडमध्ये दिसणार..

नीलेश अडसूळ

shamshera : बॉलीवूडमध्ये आता वेगवेगळ्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळताना दिसत आहे. त्यातही रणबीर कपूरच्या 'ब्रम्हास्त्र' आणि 'शमशेरा' या चित्रपटांची चर्चा आधी आहे. या दोन्ही चित्रपटात राणबीर कपूर प्रमुख भूमिकेत आहे. आता दिवसेंदिवस 'शमशेरा' च्या बाबतीत नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलर ने प्रेक्षकांना पार हादरवून सोडलंच पण संजय दत्त आणि रणबीरचा लुक बघून चाहते चक्रावून गेले. असा रणबीर कपूर (Ranbir Kapoor), अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) यांच्या 'शमशेरा' (Shamshera) या चित्रपटाचा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण यातील एक आनंदाची बाब म्हणजे एका मराठी अभिनेत्याने या चित्रपटात महत्वाची भूमिका पार पाडली आहे. तो कलाकार सध्या एका प्रसिद्ध मालिकेत आहे.

स्टार प्रवाह वरील सर्वाधिक गाजलेली मालिका म्हणजे 'सुख म्हणजे नक्की काय असतं'. या मालिकेत दादा अंमई माईन ही जोडी लोकप्रिय आहे. त्यातील दादा म्हणजे अभिनेते सुनील गोडसे. (suneel godse) आजवर त्यांनी अनेक मालिका, नाटक आणि चित्रपट केले आहे. आता ते थेट रणबीरच्या 'शमशेरा'मध्ये दिसणार आहेत. सुनिल गोडसे बॉलिवूड चित्रपटात दिसणार असल्यानं त्यांच्या चाहत्यांमध्ये एक वेगळा उत्साह पहायला मिळत आहे. चित्रपटातील त्यांची भूमिका किती दमदार असणार याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. (This Marathi actor will appear in Ranbir's 'Shamshera' movie)

सुनील गोडसे यांनी मराठीसोबतच हिंदी मालिका आणि चित्रपटातंही त्यांनी काम केले आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींची तगडी स्टार कास्ट असलेल्या ‘शमशेरा’मध्ये एक मराठमोळा अभिनेता आपल्या भेटीला येणार असल्याने मराठी प्रेक्षक भलतेच आनंदी झाले आहे. हा चित्रपट हिंदी बरोबरच तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये देखील रिलीज होणार आहे. आदित्य चोप्रा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT