'Tiger 3's' event: Salman, Katrina smile as young fans dance to film's song  SAKAL
मनोरंजन

Tiger 3 Event: सलमान - कतरिनासमोर नाचली छोटी मुलगी, अशी होती कतरिनाची प्रतिक्रिया, व्हिडीओ बघा

टायगर 3 च्या इव्हेंटला एक मुलगी सलमान - कतरिनासमोर बिनधास्त नाचली, व्हिडीओ बघा

Devendra Jadhav

Tiger 3 Event Video News: सलमान खान - कतरिना कैफ यांच्या टायगर 3 सिनेमाची उत्सुकता आहे. सलमान - कतरिनाच्या टायगर 3 च्या आगाऊ बुकींगला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. टायगर 3 निमित्ताने सलमान - कतरिना अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा झळकणार आहेत.

टायगर 3 निमित्ताने मुंबईत एका इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या एका छोट्या मुलीने कतरिनासमोर डान्स केला. त्यावेळी कतरिनाची प्रतिक्रिया बघण्यासारखी आहे.

छोट्या फॅन्स सलमान - कतरिनासोबत नाचल्या

सलमान खान आणि कतरिना कैफ यांनी अलीकडेच 'टायगर 3' साठी मुंबईत एका फॅन मीटला हजेरी लावली. या फॅन इव्हेंटमधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

या व्हिडीओत टायगर 3 मधलं गाणं वाजवण्यात येतं. हे गाणं वाजताच खाली एक लहान मुलगी बिनधास्त नाचते. आणि त्या लहान मुलगी सोबत आणखी एक मुलगी स्टेजवर येते.

या दोन्ही छोट्या फॅन्स सलमान - कतरिनासमोर सुंदर नाचतात. या दोघीही 'टायगर 3'च्या गाण्यांवर थिरकत होते.

अशी होती कतरिनाची प्रतिक्रिया

या मुली नाचत अचानक स्टेजवर आल्याने कतरिना - सलमानला सरप्राईज मिळालं. कतरिना कौतुकाने या मुलींकडे पाहत होती. या दोघींनी डान्स केल्यावर सलमान - कतरिनाने त्यांना मिठी मारली.

सलमान - कतरिनाने या फॅन मीट इव्हेंटमध्ये खुप एन्जॉय केलं. दोघांनीही फॅन्सच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. आणि सर्वांना 'टायगर 3' पाहण्याचं आवाहन केलं.

टायगर 3 प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार यात शंका नाही. YRF टायगर 3 हा YRF स्पाय युनिव्हर्स आजवरचा सर्वात भव्यदिव्य सिनेमा असणार यात शंका नाहीय.

टायगर 3 हिंदीसोबतच तमिळ डब आणि तेलुगु डब आवृत्त्यांमध्ये प्रदर्शित होईल. टायगर 3 सिनेमा १२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT