Tiger 3 Katrina Kaif BTS leaked:  Esakal
मनोरंजन

Tiger 3: 'टायगर'वर भारी पडेल 'झोया'! कतरिना कैफचा 'टायगर 3'मधला थरारक सीन लीक!

Vaishali Patil

Tiger 3 Katrina Kaif BTS leaked: सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर 'टायगर 3' ची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटाचा टिझर रिलिज झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता आणखीच वाढली आहे. आता सलामान आणि कतरिनाच्या चाहत्यांना या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतिक्षा लागली आहे.

लवकरच सलमानच्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज होणार आहे तर 'टायगर 3' हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे पुन्हा सलमान आणि कतरिनाची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. यात सलमान भारताच्या रॉ एजंट टायगरच्या भूमिकेत तर कतरिना कैफ झोयाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'टायगर 3' हा बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चाहते सलमान आणि कतरिनाची दमदार अ‍ॅक्शन पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

तर यातील सलमान खानचा लूक तर काही दिवसांपुर्वी शेयर करण्यात आला होता मात्र आता 'टायगर 3' मधील कतरिना कैफचा अॅक्शन सीन लीक झाला आहे. सध्या कतरिनाचा हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अॅक्शन फोटोमध्ये कतरिना कैफ बाईकवरून उडी मारताना दिसत आहे.

हा चित्रपटातील अॅक्शन सीन आहे मात्र यात तिचा चेहरा दिसत नाही. तिने काळ्या रंगाचा ड्रेस आणि काळे हेल्मेट घातले आहे.

या फोटोतील व्यक्ती कतरिना असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा व्हायरल फोटो पाहून ती कतरिना नसून तिची स्टंट बॉडी डबल आहे असं देखील तिचे चाहते बोलत आहेत.

तर चित्रपटाबाबत बोलायचं झालं तर 'टायगर 3' हा सिनेमा 16 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित यांनी 'टायगर 3' दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

यशराज फिल्म्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर सलमान खान आणि कतरिना कैफचा फर्स्ट लूक शेअर करून या चित्रपटाची घोषणा केली होती.

या चित्रपटात शाहरुख खानचा कॅमिओही दिसणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफसोबत इमरान हाश्मीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला फटका

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT