Tiger 3 Movie Review Salman Khan Katrina Kaif Shah rukh khan
Tiger 3 Movie Review Salman Khan Katrina Kaif Shah rukh khan esakal
मनोरंजन

Tiger 3 Movie Review : 'सुतळी बॉम्ब' म्हणून पाहायला जाल, हाती येईल 'नागगोळी'! टायगरनं पुन्हा एकदा...

युगंधर ताजणे

Tiger 3 Movie Review Salman Khan Katrina Kaif Shah rukh khan : सलमान खान हे नावच असं आहे की ज्याचा प्रभाव गेल्या तीन ते चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. सलमाननं आजवर जे काही केलं त्याची चांगली चर्चा कमीच झाली. तो नेहमीच टीकेचा धनी राहिला. त्याचा दबंग जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा असे वाटले होते की, आता तो योग्य ट्रॅकवर आला आहे. त्याला त्याचा फॉर्म गवसला आहे. पण तसं म्हणणं चूकीचचं होतं. हे त्यानं टायगर ३ मधून दाखवून दिलं आहे.

बॉलीवूडमधील प्रस्थापित अभिनेत्यांचे एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे एकदा त्यांनी त्यांचा फॅन बेस सेट केला की मग त्यांना कसलीही काळजी करण्याची गरज नाही. ते नेहमीच सुखी होऊन जातात. लाखोंच्या संख्येनं जोडलेला चाहतावर्ग तुमच्यापासून काही केल्या तुटत नाही. फॅन सोडून जाण्याची प्रोसेस तशीही फार वेगानं होत नाही. बॉलीवूडमध्ये तरी नाही. त्यामुळे संबंधित मेगा स्टार कलाकारांना भीती बाळगण्याची गरजच नसते.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूडचा ट्रेंड जर पाहिला तर तो कमालीच्या वेगानं बदलेला दिसतो आहे. कोरोनाच्या काळापासून दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉलीवूडच्या चाहत्यांच्या मनाचा जो कब्जा घेतला त्यामुळे बॉलीवूड निर्माते, दिग्दर्शक आणि मोठमोठे कलाकार हादरुन गेले होते. त्यात सलमान, आमिर आणि शाहरुख यांनी जाहीर कार्यक्रमांमध्ये त्यावर भाष्यही केले होते. सलमाननं तर म्हणाला होता की, आपल्याला बॉलीवूडमधील हिरोइझम पुन्हा आणण्याची गरज आहे.

टायगर ३ मधून सलमाननं त्याचा शब्द खरा करून दाखवला आहे. टायगर ३ मध्ये त्यानं काही अंशी प्रेक्षकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.त्यात तो थोड्या फार प्रमाणात यशस्वीही झाल्याचे दिसून येते. यापूर्वीही टायगरनं ज्या काही करामती केल्या आहेत त्याला जेमतेम प्रतिसाद मिळाला होता. पठाण, जवान, आणि आता टायगर ३ यातून पुन्हा तेच भारत-पाकिस्तान गुप्तहेरांच्या कथा, त्यांचे नातेसंबंध, त्यांचे सिक्रेट मिशन आणि हॅप्पी एंडिग दिसून येते.

टायगर ३ मध्ये देखील पुन्हा पहिल्या सारखाच तोचतोचपणा आहे. नवीन काहीही नाही. अॅक्शन सीन्स थोडेफार लक्ष वेधून घेणारे आहे. बॉलीवू़डनं आता साऊथचा एक फॉरमॅट घेतला आहे. तो म्हणजे लाऊडमध्ये बॅकग्राउंड म्युझिक, फास्ट अॅक्शन सीन्स, तेवढचं वेगवान स्क्रिप्ट, एडिटिंग आणि डोकं गरगरुन टाकणारी सिनेमॅटोग्राफी. पण यात साऊथच्या काही मुव्हींची स्क्रिप्ट आणि त्यांचा स्क्रिनप्ले इतका तगडा असतो की आपण त्यात पूर्णत अडकून पडतो. गुंग होऊन जातो. सलमानच्या टायगरच्या बाबत तसे काही होत नाही.

काय आहे टायगर ३ ची कथा....

अविनाश उर्फ टायगरनं पाकिस्तानी गुप्तहेर झोयाशी लग्न केले आहे. त्यांना ज्युनिअर नावाचा मुलगाही आहे. गोष्ट लंडनमधील १९९९ च्या एका प्रसंगापासून होते,जिथे झोयाच्या वडिलांचा कशाप्रकारे मृत्यू झाला हे दाखवण्यात आले आहे. त्याचा झोयाच्या मनावर परिणाम होतो आणि तिलाही आता पाकिस्तानच्या सिक्रेट सर्व्हिसमध्ये काम करण्याची इच्छा अनावर होते. या सगळ्यात तिला मदत करतो तो आतिश रहमानी (इमरान हाश्मी) त्याचे कारण झोयाच्या वडिलांनी त्याचाही सांभाळ केला होता.

कट टू...आता झोया टायगर सोबत ऑस्ट्रियामध्ये सुखात आहे. मात्र त्याचवेळी आतिशचा मास्टर प्लॅन तिच्या लक्षात येत नाही. आणि त्यानंतर सुरु होतो टायगरला त्रास देण्याचा खेळ. त्याला आणि जोयला एका वेगळ्याच प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जातो. टायगर आणि आतिशची एका गोष्टीमुळे खुपच खुन्नस आहे. ते कारणही खूपच पर्सनल आहे. ते जाणून घ्यायचे असल्यास तुम्हाला टायगर ३ च्या वाट्याला जावं लागेल. आतिशनं जो प्लॅन केला आहे त्यामुळे टायगरच्या कुटूंबाचे अस्तित्वच पणाला लागले आहे.

शेवटी त्याचं नाव टायगर आहे. तो काही शांत बसणारा नाही. टायगरला एका भारतीय गुप्तेहरानं आपल्यातच कुणी डबल एजंट आहे असे सांगितलं आहे. तेव्हापासून टायगरचा जोयावरील संशय वाढतो आहे. तो संशय ठाम व्हावा अशा गोष्टी देखील योगायोगानं घडल्या आहेत. त्यामुळे एक प्रेक्षक म्हणून आपण चित्रपटात गुंग होऊन जातो तोच सारखे सारखे व्टिस्ट येऊ लागतात.काही गोष्टी तर पूर्णपणे डोक्यावरुन जाऊ लागतात. पण सलमान म्हणा किंवा शाहरुख यांचे चित्रपट पाहताना त्याचा फारसा विचार करायचा नसतो ही गोष्ट गृहित धरावी लागते.

आतिषचा नेमका प्लॅन काय असतो, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनाही टायगरची दखल का घ्यावी लागते, किंग खान मध्येच भाईजानला वाचविण्यासाठी का येतो, आता पुन्हा टायगर ४ मधून कोणती गोष्ट समोर येणार, जोयानं खरंच टायगरचा विश्वासघात केला होता का, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी असल्यास टायगर ३ पाहायला जाण्यास हरकत नाही.

आता शाहरुखनं खाल्ला भाव....

किंग खानचा पठाण आला होता तेव्हा त्यामध्ये शाहरुख अडचणीत असताना त्याला वाचविण्यासाठी भाईजानची इंट्री होते. यातही थोड्याफार फरकानं असचं काहीसं आहे. किंग खानचा तो दमदार परफॉर्मन्स पाहण्यासाठी थिएटमध्ये जावेच लागेल. त्यात दोन्ही खान कलाकारांमधील तो संवादही प्रेक्षकांची दाद मिळवून जाणारा आहे. त्यावर त्यांना प्रेक्षकांच्या टाळ्या अन् शिट्ट्या मिळाल्याशिवाय राहत नाही.

लोकांना आणखी किती वेडं करणार....

त्याचं काय आहे की, बॉलीवूड एका ठराविक विषयांच्या पलीकडे जायला मागतच नाही की काय असे दिसून आले आहे. यापूर्वी याच वर्षी शाहरुखचे जे दोन चित्रपट प्रदर्शित झाले त्यामध्ये त्यानं भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली होती. दीपिका पाकिस्तानी गुप्तहेर होती. सलमानच्या टायगरच्या तीनही भागांमध्ये तो भारतीय एजंट आणि कतरिना पाकिस्तानी गुप्तहेर आहे.

सध्या ओटीटीवर विविध विषयांवरील, भाषांमधील कंटेट तितक्याच प्रभावीपणे समोर येत असताना त्यामध्ये स्पाय स्टोरीजला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे. अशावेळी आता प्रेक्षकांना स्पाय स्टोरीवरील चित्रपट, त्यांची प्रोसेस, लॉजिक, मिशन, याविषयी बऱ्यापैकी माहिती आहे. अशातच बॉलीवूडपटांमध्ये जेव्हा स्पाय स्टोरीजबद्दल सांगितले जाते तेव्हा वरील निकषांतून त्याकडे पाहिल्यावर हाती निराशा येते एवढे मात्र नक्की.

अभिनय, संगीत अन् बरचं काही....

दिग्दर्शक मनीष शर्मा यांच्या टायगर ३ ने बऱ्यापैकी मनोरंजन केले आहे. मात्र यामध्ये शाहरुखचे दोन्ही चित्रपट आणि टायगर यांची तुलना होणे स्वाभाविक आहे. त्यामध्ये शाहरुखनं अभिनय, अॅक्शन, दिग्दर्शन यामध्ये बाजी मारल्याचे दिसून येते. टायगर ३ मध्ये सलमानपेक्षा इमरान हाश्मी अधिक प्रभावी वाटते. कतरिनानं बऱ्यापैकी लक्ष वेधून घेतले आहे. सलमानचं वय झालं आहे हे त्याच्या देहबोलीवरून दिसून येते. पण तो आपण अजूनही टायगरच आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतोच.

पाहावा की नाही....

शाहरुख, सलमानच्या चाहत्यांची गोष्टच वेगळी. त्यामुळे भाईजानचे चाहते टायगरच्या वाटेला जाणार यात शंका नाही. मात्र ते देखील यावेळी किंग खान आणि सलमान यांच्या चित्रपटांमध्ये तुलना करतील यात शंका नाही. टायगर ३ मध्ये आणखी दमदार कथा असती तर त्यानं चित्रपट वेगळ्याच उंचीवर गेला असता. नेहमीप्रमाणे देशभक्तीचा डोस देत आपण काही भव्य दिव्य करतो आहोत असं चित्र निर्माण करुन, प्रेक्षकांना जिंकून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न टायगर ३ मध्ये करण्यात आला आहे.

-----------------------------------------------

चित्रपटाचे नाव - टायगर ३

दिग्दर्शकाचे नाव - मनीष शर्मा

कलाकारांची नावं - सलमान खान, कतरिना कैफ, इमरान हाश्मी, कुमूद मिश्रा, रणवीर शौरी

रेटिंग - पाचपैकी अडीच स्टार, **1/2

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT