Tiger 3 Release: Esakal
मनोरंजन

Tiger 3 Release: 'टायगर 3' रिलीज होण्यापूर्वी सलमान- कतरिना का घाबरले? चाहत्यांना केली विंनती

Tiger 3 Release: 'टायगर 3' च्या रिलीजपूर्वी सलमान खान आणि कतरिना कैफने 'टायगर 3' संदर्भात चाहत्यांना एक विनंती केली आहे.

Vaishali Patil

Tiger 3 Release: सध्या मनोरंजन विश्वात फक्त सलमान खान आणि कतरिना कैफच्या 'टायगर 3' ची चर्चा सुरु आहे. 'टायगर 3' आता रिलीजसाठी सज्ज झाला आहे. दिवाळीच्या खास मुहूर्तावर हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सलमान खानच्या चाहत्यांना या चित्रपटाची प्रतिक्षा लागून होती. आता उद्या हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'टायगर 3' चित्रपटाच्या अ‍ॅडवान्स बुकींगला देखील प्रेक्षकांचा खुप प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हा सिनेमा पहिल्याच दिवशी 30-40 कोटी रुपयांची धमाकेदार ओपनिंग देणार अशी चर्चा आहे. मात्र दुसरीकडे भाईजान आणि चित्रपटाच्या निर्मात्यांना वेगळी चिंता लागली आहे.

'टायगर 3' च्या रिलीजपूर्वी सलमान खान आणि कतरिना कैफने 'टायगर 3' संदर्भात चाहत्यांना एक विनंती केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून 'टायगर 3'चे स्पॉयलर शेअर न करण्याचे आवाहन त्यांनी आपल्या चाहत्यांना केलं आहे.

Tiger 3 Release

सलमान खानने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक नोट शेयर केली आहे. सलमान या नोटमध्ये लिहितो की, 'आम्ही 'टायगर 3' खूप उत्सुकतेने बनवला आहे आणि जेव्हा तुम्ही चित्रपट पाहाल तेव्हा तुम्ही चित्रपटचा स्पॉयलर देणार नाही असा विश्वास आम्ही तुमच्यावर ठेवतो.

स्पॉयलर दिल्यामुळे चित्रपट पाहण्याचा अनुभव खराब होऊ शकतो. जे योग्य आहे तेच तुम्ही कराल असा आम्हाला विश्वास आहे.

'टायगर 3' ही तुमच्यासाठी आमच्याकडून दिवाळीची सर्वोत्तम भेट ठरेल अशी आम्हाला आशा आहे !! उद्या हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tiger 3 Release

तर दुसरीकडे कतरिनाने देखील तिच्या इंस्टा स्टोरीत स्पॉयलर शेअर न करण्याबद्दल पोस्ट केली आहे.

यात तिने लिहिले की, "'टायगर 3' मधील स्टोरीचे ट्विस्ट आणि आश्चर्यांमुळे चित्रपट पाहण्याचा अनुभव आणखी चांगला होतो! म्हणून, आम्ही तुम्हाला विनंती करतो की कोणतेही स्पॉयलर शेयर करू नका.

आमच्या प्रेमाचे आणि कामाचे रक्षण करण्याची शक्ती तुमच्या हातात आहे जेणेकरून सर्व लोकांचे सर्वोत्तम मनोरंजन देऊ शकेल. धन्यवाद आणि दिवाळीच्या शुभेच्छा!'

यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली आणि मनीष शर्माच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'टायगर 3' हा टायगर फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे. सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीशिवाय या चित्रपटात शाहरुख खान देखील दिसणार आहे. हा चित्रपट 12 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे शो सकाळी 7 वाजल्यापासून सुरु होणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT