Tiger 3 OTT Release: सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर 'टायगर 3' हा सिनेमा 12 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. भाईजानच्या या चित्रपटाची प्रेक्षकांना प्रतिक्षा होती. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलिज झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
'टायगर 3' हा YRF स्पाय युनिव्हर्सचा पाचवा चित्रपट आणि टायगर फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट होता. या चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा कतरिना आणि सलमानची जोडी पहायला मिळाली तर इम्रान खान खलनायकाच्या भुमिकेत दिसला.
कमाईच्या बाबतीत 'टायगर 3' चित्रपटाने जगभरात 450 कोटींहून अधिक कमाई केली. तर जागतिक स्तरावर या चित्रपटाने 300 कोटींचा गल्ला जमवला होता.
चाहते अजूनही या सिनेमाला पसंती देत आहे. तर हा सिनेमा आता लवकरच ओटीटी रिलीज होणार आहे.
'टायगर 3' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर कधी रिलीज होणार आहे, हे जाणुन घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. तर आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपणार आहे.
रिपोर्टनुसार, 'टायगर 3' चे डिजिटल अधिकार Amazon प्राइम व्हिडिओला मोठ्या रकमेत विकले गेले आहेत. हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मात्र 'टायगर 3' च्या OTT रिलीज तारखेची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही मात्र हा सिनेमा जानेवारीच्या सुरुवातीस ओटीटीवर येणार अशी चर्चा आहे.
मनीष शर्मा दिग्दर्शित 'टायगर 3' हा टायगर फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. 2012 मध्ये एक था टायगर आणि 2017 मध्ये टायगर जिंदा है या सिनेमांच्या यशानंतर टायगर 3 रिलिज झाला. या चित्रपटांची निर्मिती आदित्य चोप्राने केली आहे.
'टायगर 3' मध्ये पुन्हा एकदा सलमान खान हा अविनाश राठोडच्या भूमिकेत दिसला तर कतरिना कैफने झोयाची भुमिका साकारली. यासोबतच सिनेमात इम्रान हाश्मीने खलनायकाची भूमिका साकारली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.