Tiger 3 Song Ruaan:  Esakal
मनोरंजन

Tiger 3 Song Ruaan: 'इश्क गहरा मेरा, तुझपे पहरा मेरा…' कतरिना-सलमानाचा रोमँटिक अंदाज! अरिजितच्या आवाजानं चाहते मंत्रमुग्ध

टायगर 3 च्या नवीन गाण्याचं रुआं: सलमान-कतरिना यांचं रोमँटिक अंदाज!

Vaishali Patil

Tiger 3 Song Ruaan: सध्या बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि कतरिना कैफ त्यांच्या आगामी 'टायगर 3' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. सलमानच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांमध्ये या चित्रपटाची खुप क्रेझ पहायला मिळत आहे.

काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज करण्यात आला त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले गाणे आणि प्रोमो रिलिज केला आता पुन्हा सलमान आणि कतरिनाच्या चाहत्यांना टायगर 3 चे निर्माते एक ट्रिट देणार आहे.

आता YRF ने त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर टायगर 3' मधील नवीन रोमँटिक गाणे रिलिज करण्यात आले आहे. अरिजित सिंगने या गाण्याला आपला आवाज दिला आह. 'रुआं' हे टायगर 3 मधील नवीन गाणे आहे. ज्यात सलमान आणि कतरिना हे रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. सध्या तरी हा व्हिडिओ लिरिकल असला तरी या गाण्यात शेवटी टायगर आणि झोयाची केमेस्ट्री पहायला मिळत आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना सलमान खानने लिहिले की, "रुआं लिरिकल व्हिडिओ आत्ता आऊट... बायोमधली लिंक... टायगर 3 या रविवारी, 12 नोव्हेंबरला हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे."

हे गाणे सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यानंतर सलमान खान आणि कतरिनाच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देणं सुरु केलं आहे. नेहमी प्रमाणे दोघांची जोडी प्रेक्षकांना खुप आवडली आहे.

टायगर 3 चे 'लेके प्रभू का नाम'चे पहिलं गाणं होत जे खुप लोकप्रिय झालं. या गाण्याला यूट्यूबवर 70 मिलियन व्ह्यूज आहेत. टायगरचे 5 नोव्हेंबरपासून चित्रपटाचे आगाऊ बुकिंग सुरू झाले आहे. आता चाहत्यांना फक्त चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा आहे.

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, चित्रपटाने आधीच अॅडवान्स बुकिंगमध्ये 4.2 कोटी रुपये कमावले आहेत आणि 140000 पेक्षा जास्त तिकिटे विकली गेली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT