tiger 3 salman khan special screening with childrens video viral on social media  SAKAL
मनोरंजन

Tiger 3: लहान मुलांसोबत सलमानने केली धमाल - मस्ती, टायगर 3 च्या विशेष स्क्रिनींगचा व्हिडीओ व्हायरल

लहान मुलांसाठी टायगर 3 चा विशेष शो आयोजित करण्यात आलेला. त्यावेळी भाईजानचा मस्तीखोर अंदाज पाहायला मिळाला

Devendra Jadhav

Tiger 3 News: सलमान खानचा टायगर 3 सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झाला. रविवारी १२ नोव्हेंबरला टायगर 3 रिलीज झाला. सिनेमाने पहिल्या दिवसापासुनच बॉक्स ऑफीसवर छप्परफाड कमाई करायला सुरुवात केलीय.

दरम्यान काल झालेल्या बालदिनानिमित्त सलमानने लहान मुलांसाठी टायगर 3 चा विशेष शो ठेवला होता. त्यावेळी स्वतः सलमानने या शोला हजर राहून लहान मुलांसोबत धमाल - मस्ती केलीय. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

टायगर 3 चा लहान मुलांसाठी विशेष शो

टायगर 3 चा बालदिनानिमित्त लहान मुलांसाठी विशेष शो ठेवण्यात आला होता. यावेळी स्वतः सलमानने या खास शोला उपस्थिती दर्शवली. सलमानचा लहान मुलांसोबत कूल स्वभाव पाहायला मिळाला.

भाईजानची एन्ट्री होताच लहान मुलांनी एकच जल्लोष केला. याशिवाय सलमानसोबत सेल्फी घेण्यासाठी लहान मुलांनी गर्दी केली. सलमानने सुद्धा न चिडता सर्वांसोबत फोटोसेशन केलं

टायगर 3 चा बॉक्स ऑफीस रिपोर्ट

टायगर 3 ने बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक कमाई करायला सुरुवात केलीय. दिवाळीच्या पहिल्या दोनच दिवसात टायगर 3 ने १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री घेतली होती.

आता टायगर 3 चा लेटेस्ट कमाईचा आकडा बघता या सिनेमा ३ दिवसांमध्ये १४० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. त्यामुळे लवकरच सिनेमा १५० कोटींचा आकडा पार करुन २०० कोटी क्लबमध्ये दाखल होईल असं दिसतंय,

टायगर 3 बद्दल थोडंसं...

दिग्दर्शक मनीष शर्माचा 'टायगर 3' हा एक अॅक्शन थ्रिलर आहे. ज्यामध्ये सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहेत तर रेवती, सिमरन, रिद्धी डोगरा, विशाल जेठवा, कुमुद मिश्रा, रणवीर शौरे आणि आमिर बशीर हे कलाकार सिनेमात आहेत. यशराज स्पाय युनिव्हर्सचा टायगर 3 हा एक भाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : दोन दिवस जेवलो नाही, खूप शोधलं पण... ताम्हिणी घाटातील अपघाताचे दृश्य पाहून मृत तरुणांचे मित्र ढसाढसा रडले

Mangalwedha News : कात्राळचे शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT