Actress Katrina Kaif Towel Fight Scene Esakal
मनोरंजन

Tiger 3 Trailer: सलमान-इम्रान राहिले बाजूला,चर्चा रंगली कतरिनाच्या टॉवेल सीनची

Vaishali Patil

Actress Katrina Kaif Towel Fight Scene: सलमान खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट टायगर 3 सध्या सोशल मीडियावर खुपच चर्चेत आहे. टायगर 3 चा धमाकेदार ट्रेलर आज रिलीज झाला आहे.

महेश शर्मा दिग्दर्शित टायगर 3 हा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा टायगर फ्रेंचायझीचा तिसरा भाग आहे. 'टायगर' आणि 'टायगर जिंदा है' नंतर आता सलमान आणि कतरिनाचे चाहते टायगर 3 साठी खुप उत्सुक आहेत.

टायगर 3 चा दमदार अ‍ॅक्शनचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात इम्रानचा बदला आणि सलमानची देशभक्ती सगळं या चित्रपटात पहायला मिळते. ट्रेलरमध्ये इम्रान हाश्मी हा खलनायकाच्या भुमिकेत प्रेक्षकांना आकर्षिक करतोय.

2 मिनिटे आणि 51 सेकंदाच्या या मनोरंजनाने भरलेल्या ट्रेलरमध्ये सलमान आणि इम्रान यांच्यात चांगलचं युद्ध होणार असं दिसतंय मात्र या ट्रेलरमध्ये सलमान आणि इम्रान हाश्मीप्रेक्षा कतरिना कैफचीच चर्चा जास्त झाली आहे.

कतरिना या ट्रेलरमध्ये फार कमी दिसली मात्र तिचा चित्रपटातील एक सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टायगरमध्ये कतरिना झोयाची भुमिका साकारत आहे. झोया ही पाकिस्तानी गुप्तहेर आहे. टायगरच्या दोन्ही भागात आपल्याला झोयाचा अ‍ॅक्शन अवतार पहायला मिळाला होता.

आता त्याच उर्जेने झोयाने टायगर 3 मध्येही एंट्री केली आहे. ट्रेलरमधील एका सीनमध्ये कतरिना फक्त टॉवेल गुंडाळून जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसत आहे.

यात ती समोरच्या शत्रूवर हल्ला करताना दिसते. आता कतरिनाचा हा टॉवेल सीन सोशल मीडियावर खुपच चर्चेत आला आहे. इतकच नाही तर नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिकिया देखील देत आहेत.

सलमान खानचा हा चित्रपट टायगर 3 स्पाय युनिव्हर्सचा पाचवा चित्रपट आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत कतरिना कैफ ही जबरदस्त अॅक्शन करताना चाहत्यांना दिसणार आहे.

यासोबतच यावेळी इम्रान हाश्मीने या चित्रपटात एंट्री घेतल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढली आहे. टायगर 3 दिवाळीच्या मुहूर्तावर 12 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. जो तमिळ, तेलगू आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: हार्दिक पांड्याचे सलाम-ए-इश्क! दोन षटकार.. शेवटच्या चेंडूवर फिफ्टी.. माहिका शर्माला फ्लाइंग Kisssss Video Viral

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Pune Property Tax: पुण्यात ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना करमाफी मिळणार का? विरोधकांची तयारी मात्र भाजपनेच...

SCROLL FOR NEXT