Tiger-Disha Breakup esakal
मनोरंजन

Tiger-Disha Breakup: टायगर - दिशाचं 'ब्रेक अप' सहा वर्षाचं प्रेमं आटलं!

: बॉलीवूडमधील सर्वात चर्चेत असणारी जोडी टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांना कुणाची नजर लागली की काय, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.

युगंधर ताजणे

Tiger Shroff-Disha Patani Breakup: बॉलीवूडमधील सर्वात चर्चेत असणारी जोडी टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांना कुणाची नजर लागली की काय, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. त्याला कारणही तसेच आहे. या दोघांनीही एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या टायगर आणि दिशाचं अखेर ब्रेक अप झाले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या ब्रेक अपच्या बातम्यांना नुसते उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु असल्याचं बोललं जात होतं. मात्र त्यांनी ब्रेक अप केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

टायगर आणि दिशा आता हे एकमेकांसोबत काम करणार नाहीत असेही सांगितले जात आहे. चाहत्यांना मात्र त्यांच्या आवडत्या सेलिब्रेटींच्या अशा प्रकारच्या बातमीनं मोठा धक्का बसला आहे. बॉलीवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारं कपल म्हणून टायगर आणि दिशाकडे पाहिले जाते. गेल्या काही महिन्यांपूर्वी ते आता लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असेही बोलले जात होते. त्यामुळे ब्रेक अपच्या बातम्यानंतर त्या गोष्टीवर पडदा पडला आहे. हिंदूस्थान टाईम्सनं दिलेल्या एका बातमीनुसार, गेल्या वर्षांपासून टायगर आणि दिशा यांच्यातील वाद समोर आले होते. तेव्हापासून त्यांच्या नात्यात कुरबूरी सुरु झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी ब्रेक अप केल्याचे बोलले जात आहे.

मात्र अजुनही दिशा आणि टायगरकडून ब्रेक अपच्या बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. खरचं दिशानं टायगरसोबत ब्रेक अप का केलं, त्यामागील कारण काय आहे याविषयी चाहत्यांच्या मनात शंका आहे. त्यामुळे दिशा तिच्या सोशल मीडियावरुन ते कारण लवकरच सांगेल असे त्यांना वाटत आहे. टायगरच्या एका मित्रानं हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या एका बातमीत त्यांचे ब्रेक अप झाले आहे याची बातमी खरी असल्याचे म्हटले होते. त्यामुळे सध्या टायगर त्याच्या प्रोजेक्टवर पूर्ण फोकस असल्याचे दिसून येत आहे. सध्या तो त्याच्या चित्रपटाच्या शुटिंगसाठी लंडनमध्ये व्यस्त आहे.

टायगर आणि दिशाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास. टायगर गणपतमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याचा बागी 4 देखील प्रदर्शनच्या रांगेत आहे. तर दिशा ही एक व्हिलन रिटर्न्समध्ये दिसणार आहे, काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिनं केलेलं बोल्ड फोटोशुट चर्चेत आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT