Tiger Shroff starer Baaghi 3 movie trailer released  
मनोरंजन

Baaghi 3 Trailer : टायगर करणार थेट सिरीयात फायटींग!

वृत्तसंस्था

मागील अनेक दिवस 'बागी ३'ची चर्चा सुरू होती. परवा त्याचे पोस्टर रिलीज झाल्यावर तर टायगर श्रॉफच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आज अखेर बागी सिरीजमधील तिसऱ्या भागाचे म्हणजेच 'बागी ३'चे ट्रेलर रिलीज झाले. अॅक्शनचा मसाला असलेल्या बागीमध्ये थेट सिरीयातील युद्ध दाखविले आहे... 

विक्रम (रितेश देशमुख) व रॉनी (टायगर श्रॉफ) दोघंही भाऊ आहेत. दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. रॉनी विक्रमला जीवापेक्षा जास्त जपतो. त्याला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचलेली रॉनीला चालत नाही. विक्रमने एक हाक दिली तरी रॉनी कायम त्यांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध होतो. पण या छान नातेसंबंधात मिठाचा खडा पडतो. पोलिस असलेला विक्रम काही कारणाने सिरीयात जातो, तेथे त्याचे अपहरण होते व हे रॉनीला सहन होत नाही. त्याचा बदला घेण्यासाठी तो थेट सिरीयात पोहोचतो व विक्रमच्या किडनॅपर्सला यमसदनी धाडतो. या सर्व लढाईत श्रद्धा कपूर त्याच्यासोबत असते. तर विक्रमच्या पत्नीची भूमिका अंकिता लोखंडेने साकारली आहे. 

'बागी ३' पूर्वी रिलीज झालेल्या 'बागी', 'बागी २' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. टायगर श्रॉफचा चाहतावर्गच वेगळा असल्याने या चित्रपटाचीही त्याच्या चताहत्यांना उत्सुकता आहे. अहमद खान यांचे दिग्दर्शन व साजिद नाडियादवालाची निर्मिती असलेला हा चित्रपट ६ मार्चला प्रदर्शित होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT