Tiger Shroff's fitness trainer Kaizzad Capadia  
मनोरंजन

Tiger Shroff |टायगर श्रॉफच्या फिटनेस ट्रेनरचं निधन

सोशल मीडियावर पोस्ट लिहित टायगरने वाहिली श्रद्धांजली

स्वाती वेमूल

अभिनेता टायगर श्रॉफचा Tiger Shroff फिटनेस ट्रेनर कैझाद कपाडियाचे Kaizzad Capadia बुधवारी (१३ ऑक्टोबर) निधन झाले. कैझादच्या निधनाचं कारण अद्याप समजू शकले नाही. मुंबईतील के११ अकॅडमी ऑफ फिटनेस सायन्सेसचा तो मालक होता. टायगरसोबतच तो इतरही बॉलिवूड सेलिब्रिटींचा फिटनेस प्रशिक्षक होता. कैझादच्या निधनानंतर टायगरने सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याला श्रद्धांजली वाहिली. चित्रपटाच्या सेटवर काम करतानाही टायगर कधीच वर्कआऊट करणं विसरत नाही किंवा टाळत नाही. कैझादची त्याला खूप साथ दिली होती.

सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर म्हणून कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो, याबद्दल कैझाद एका मुलाखतीत म्हणाला होता, "माझ्यासाठी, माझी फी भरण्यास तयार असणारी कोणतीही व्यक्ती ही सेलिब्रिटीच आहे. सेलिब्रिटी, अभिनेते, अभिनेत्री, मॉडेल्स यांच्यासोबत काम करताना माझ्यासमोर फार काही आव्हानं नसतात. फिट नसेल तर सेलिब्रिटीलासुद्धा काम मिळत नाही. त्यामुळे ते अत्यंत शिस्तबद्ध असतात. त्यांचा आहार आणि व्यायामाच्या वेळापत्रकाबाबत नियोजन मी करतो."

टायगरचे पुढील प्रोजेक्ट्स

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'बागी ३' या चित्रपटात टायगरने भूमिका साकारली होती. सध्या तो 'हिरोपंती २' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. अहमद खान दिग्दर्शित या चित्रपटात तारा सुतारिया टायगरसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे. याशिवाय 'बागी ४' आणि 'गणपत' हे दोन चित्रपट प्रतीक्षेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : कोयना धरण निम्म्याहून अधिक भरलं! पण 100 टक्के भरण्यासाठी अजून किती टीएमसी पाण्याची गरज? पाहा लेटेस्ट अपडेट

IND vs ENG Weather Update: भारत-इंग्लंड शेवटच्या टी२० सामन्यात पावसाचा धुमाकूळ की होणार पूर्ण खेळ? हवामान खात्याने दिला 'हा' इशारा...

Latest Marathi News Live Update : येरवडा गणेश नगर परिसरात दोन गटांतील मुलींमध्ये जोरदार हाणामारी

Hingoli: माळसेलूत चिखल तुडवत विद्यार्थी शाळेत ; रस्त्याची दुरवस्था; पालकांत तीव्र संताप; आरोग्याचा प्रश्नही गंभीर, ग्रामपंचायतीचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Maharashtra ATS Raids : पाकिस्तानी गुंडांशी सोशल मीडिया कनेक्शन! कोल्हापूरच्या 2 तरुणांची 10 तास कसून चौकशी; 'एटीएस'कडून राज्यभरात 112 तरुणांची झाडाझडती

SCROLL FOR NEXT