Tigmanshu Dhulia Latest News esakal
मनोरंजन

Tigmanshu Dhulia 'काश्मिर फाईल्स अतिशय बेकार चित्रपट, अशा चित्रपटांमुळे...' पान सिंग तोमरच्या तिग्मांशू धुलियानं केली आगपाखड

प्रसिद्ध दिग्दर्शक तिग्मांशू धुलियानं त्याच्या एका मुलाखतीतून बॉलीवूडमधील प्रोपगंडा चित्रपटांविषयी सांगितलं आहे.

युगंधर ताजणे

Tigamanshu Dhulia : गॅग्स ऑफ वासेपूर सारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना जिंकून देणाऱ्या आणि साहेब बिवी और गँगस्टर, पान सिंग तोमर सारख्या (Tigmanshu Dhulia dismisses ‘bekaar’ films like Kashmir Files ) चित्रपटांमधून प्रेक्षकांची वाहवा मिळवणाऱ्या तिग्मांशू धुलियानं आता कश्मिर फाईल्सच्या दिग्दर्शकावर आगपाखड केली आहे.

आपल्या सडेतोड आणि परखड वक्तव्यांमुळे तिग्मांशू धुलिया हा नेहमीच चर्चेत राहिला आहे. आजवर तो त्याच्या प्रतिक्रियांमुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही सापडला आहे. अशातच त्यानं पुन्हा एकदा विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मिर फाईल्स या चित्रपटावर सणकून टीका केली आहे. इंडियन एक्सप्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे.

तिग्मांशूनं भारतातील प्रोपगंडा चित्रपटांविषयी त्याच मत व्यक्त केलं आहे. यावेळी त्यानं भारतीय चित्रपट आणि त्यातील पॉलिटिकल आयडीयाज यावर रोखठोकपणे भाष्य केलं आहे. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात राजकीय विचारधारेनं प्रेरित झालेले चित्रपट आहेत. पॉलिटिकल अजेंडा घेऊन कलात्मक दिवाळखोरी दाखवण्याचे काम काही चित्रपटांनी केलं आहे. अजेंडा घेऊन सिनेमा करणाऱ्यांकडे पाहून भीती वाटते. यावेळी त्यानं स्टिव्हन स्पिलबर्ग आणि मार्टिनी स्कोर्सेसी यांच्या चित्रपटांची उदाहरणं दिली आहेत.

तिग्मांशूनं रेड माईक नावाच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, काश्मिर फाईल्स नावाच्या चित्रपटाविषयी काय बोलायचे, अशा प्रकारचे चित्रपट भलतेच बेकार आहेत. कोण पाहतं असे चित्रपट ते तर चालत पण नाहीत...फक्त यात एकच चित्रपट चालला होता त्याचे नाव काश्मिर फाईल्स. मला त्या विषयी काही बोलायचं नाही. ते बेकार चित्रपट आहेत. अशा चित्रपटांमुळे आपण आपल्या मुळ विषयांपासून भरकटत जातो. या आशयाचे वक्तव्य धुलियानं केलं. त्यानंतर त्यावरुन वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे.

तिग्मांशूनं यावेळी स्टिव्हन स्पिलबर्गचं उदाहरण दिलं. तो म्हणतो ज्या दिग्दर्शकाचा शब्द हा हॉलीवूडचा रुलबूक असतो त्या दिग्दर्शकाची वेगळी ओळख ती काय, तसेच तुम्हाला जर मार्टिन स्कॉर्सिसीचे चित्रपट ओळखायचे असेल तर त्याच्या चित्रपटांची वैशिष्ट्य माहिती असावी लागतात. पण या दिग्दर्शकांची वेगळी विचारसरणी आहे. त्यामुळे ते ओळखले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT