'Tiku Weds Sheru' esakal
मनोरंजन

'Tiku Weds Sheru' आहे तरी काय? चक्क कंगना रनौतच्या चित्रपटात दिसणार...

यासगळ्यात कंगनाच्या क्वीन, तनू वेड्स मन्नू आणि तन्न वेड्स मन्नू रिटर्न्स सारख्या चित्रपटांमुळे कंगनाकडे पाहण्याचा चाहत्यांचा दृष्टिकोन बदलून गेला.

युगंधर ताजणे

Tiku Weds Sheru Kangana Ranaut production Nawazuddin : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना ही भलेही तिच्या वाचाळपणामुळे चर्चेत येत असेल पण तिनं तिच्या अभिनयानं लाखो चाहत्यांना जिंकून घेतले आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये असणाऱ्या कंगनाच्या आजवर चित्रपटांमध्ये तिनं केलेल्या भूमिकांना चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली आहे.

यासगळ्यात कंगनाच्या क्वीन, तनू वेड्स मन्नू आणि तन्न वेड्स मन्नू रिटर्न्स सारख्या चित्रपटांमुळे कंगनाकडे पाहण्याचा चाहत्यांचा दृष्टिकोन बदलून गेला. त्यामुळे की काय त्यापुढील कंगनाच्या चित्रपटांना चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. सध्या कंगना ही तिच्या इमर्जन्सी नावाच्या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये कंगनानं भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

आता प्राइम व्हिडिओने कंगना रनौतच्या मणिकर्णिका फिल्म्सद्वारे निर्मित, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर अभिनीत टिकू वेड्स शेरूच्या जागतिक प्रीमियरची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी आगळी वेगळी ट्रीट ठरणार आहे. प्राइमनं टिकू वेड्स शेरूच्या जागतिक प्रीमियरची घोषणा केली आहे. साई कबीर श्रीवास्तव दिग्दर्शित, या चित्रपटात नवाझुद्दीन सिद्दीकी आणि अपकमिंग स्टार अवनीत कौर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्सद्वारे निर्मित, ही टिकू आणि शेरूच्या विलक्षण प्रेम आणि उत्कटतेची कथा आहे. टिकू वेड्स शेरू 23 जून रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. टिकू वेड्स शेरू, दोन विलक्षण, रोमँटिक पात्रांची कथा असून त्यांना बॉलीवूडमध्ये स्वताच्या नावाची वेगळी ओळख तयार करायची आहे. त्या दरम्यान त्यांना ज्या अडचणी येतात, ज्या संघर्षाला सामोरं जावं लागतं हे प्रेक्षकांना चित्रपटामध्ये पाहता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT