मनोरंजन

नीरज चोप्राचं बॉलीवूड अभिनेत्यांना चॅलेंज: एकाच जाहिरातीत पाच भूमिका

युगंधर ताजणे

मुंबई - टोकियो ऑलिम्पिकमध्ये (tokiyo olympics) भालाफेक क्रीडाप्रकारात देशाला सुवर्ण पदक मिळवून देणारा खेळाडू म्हणून नीरज चोप्राचं (neeraj chopra) नाव सर्वांना माहिती झालं. त्यानंतर त्याच्यावर प्रचंड प्रमाणात कौतूकाचा वर्षांव झाल्याचे दिसून आले. देशभरातल्या मीडियानं त्याच्या वेगवेगळ्या पैलूंवर बातम्या करुन त्याची वेगळी छबी प्रेक्षकांसमोर सादर केली. सुवर्णपदक मिळवल्यानंतर नीरजला जाहिरातीच्या ऑफर नसत्या आल्या तर नवल म्हणावं लागलं असतं. दुसरीकडे त्याला मीडियानं दिलेल्या ग्लॅमरमध्ये तो प्रचंड लोकप्रियही झाल्याचं दिसून आलं. आता नीरजची एक जाहिरात सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आहे. त्यात त्यानं एक दोन नव्हे तर पाच वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. त्यावर एका युझर्सनं प्रतिक्रिया देताना त्याला बॉलीवूडच्या अभिनेत्यांना टक्कर देण्यास नीरज येतोय. अशा प्रकारची कमेंट केली आहे.

नीरज आता चर्चेत आहे त्याच्या जाहिरातीमुळे. त्याची ही पहिलीच जाहिरात आहे. त्यात त्यानं केलेल्या कामाचे प्रेक्षकांनी कौतूक केलं आहे. त्या जाहिरातीमध्ये त्यानं पत्रकार, चित्रपट दिग्दर्शक, मार्केटींग गुरु आणि बँक क्लार्कच्या भूमिकेत आहे. त्या सर्व भूमिकांना त्यानं न्याय दिला आहे. नीरज चोप्रानं त्या जाहिरातीचा व्हि़डिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्यात त्यानं त्या जाहिरातीला 360 डिग्री मार्केटींग असं म्हटलं आहे. त्यावर त्याच्या चाहत्यांनी त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही केल्या आहेत. यापूर्वी नीरज चोप्रा हा कौन बनेगा करोडपती शो मध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी त्याला त्या शो मध्ये पाहून प्रेक्षकांना धक्का बसला होता. शो मध्ये त्यानं आपल्याला फिटनेससाठी जी मेहनत घेतली त्याच्याविषयी सांगितलं. त्यामुळे प्रेक्षक भारावून गेले होते.

आताची नीरजची ती जाहिरात पाहून प्रेक्षकांना एक वेगळं सरप्राईज मिळालं आहे. त्यांनी त्या जाहिरातीवर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही केल्या आहेत. एका युझर्सनं म्हटलं आहे की, नीरजची ती जाहिरात पाहून मला असं वाटतं की, आता बॉलीवूडमधील कलाकारांचे करिअर संकटात आहे. अशाप्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट देऊन चाहत्यांनी नीरजचा उत्साह वाढवला आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद देखील मोठा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: लोकसभेच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी लातूरमधील उदगीर येथे दाखल

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

IPL 2024 DC vs MI Live Score : वूडने मुंबईला मिळवून दिलं तिसरं यश, पण दिल्लीचीही 200 धावांकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT