Ram Charan Daughter: Esakal
मनोरंजन

Ram Charan Daughter: राम चरणने दाखवली लेकीची पहिली झलक! मुलीसाठी तयार केली खास धून! चाहते खुश...

Vaishali Patil

गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वातुन गोड बातम्या समोर येत आहेत. बऱ्याच कलाकारांच्या घरी छोट्या पाहूण्याचे आगमन झाले. त्यातच साऊथ सुपरस्टार राम चरण आणि त्याची पत्नी उपासना यांच्या घरी ही परीचे आगमन झाले आहे. लग्नाच्या 11 वर्षानंतर या जोडप्याने मुलीचे स्वागत केले आहे.

राम चरणच्या घरी 20 जूनला मुलीचा जन्म झाला. त्याची पत्नी उपासनाला 19 जून रोजी संध्याकाळी हैदराबाद येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि मध्यरात्री तिने मुलीला जन्म दिला.

आता चार दिवसांनंतर उपासना आणि तिच्या लहान परिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यावेळी रुग्णालयाबाहेर त्याचे चाहेत आणि मिडियाचे लोक दोघांची झलक पाहण्यासाठी उत्सूक होते.

त्यातच आता राम चरण यांची मुलगी आणि पत्नीसोबतचा राम चरणचा पहिला फोटोही समोर आला आहे. या दाम्पत्यांनी त्यांच्या मुलीसह पहिली सार्वजनिक उपस्थिती दिली. सध्या या कुटुंबाचे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या खुप व्हायरल होत आहेत.

हॉस्पिटलमधून बाहेर पडताना राम चरण आणि त्यांची पत्नी उपासना यांनी आपल्या मुलीला आपल्या मिठीत घेतले होते. त्याने मुलाचा चेहरा झाकला. चिरंजीवीच्या घरी जाताना अभिनेत्याची आई सुरेखाही या जोडप्यासोबत होती.

रामचरण-उपासना 11 वर्षांनंतर आई-वडील झाल्याने ही आनंदाची बातमी त्याच्यासाठी खुपच खास होती. चाहते रामचरण आणि उपासनाच्या बाळाची आतुरतेने वाट पाहत होते.

राम चरणनही त्याच्या पत्नीच्या आरोग्याविषयी अनेक अपडेट शेयर करत होता. 14 जून रोजी राम चरण आणि उपासना यांनी त्यांच्या लग्नाचा 11 वा वाढदिवस साजरा केला आणि 5 दिवसांनीच त्याच्या घरी लेकीचा जन्म झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT