tollywood actress kannada big boss contestant chaitra kotoor attempts suicide 
मनोरंजन

लग्न झालं, सासरचे घरात घेईना; अभिनेत्रीनं रागाच्या भरात घेतलं फिनाईल

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - एकीकडे बॉलीवूडचा कोरोनानं त्रस्त केलं असताना दुसरीकडे टॉलीवूडमध्ये धक्कादायक गोष्ट घडली आहे. त्यामुळे साऊथ फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. प्रसिध्द अभिनेत्री चैत्रा कोट्टुरनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. चैत्राची दुसरी ओळख म्हणजे ती कन्नड बिग बॉसमधील माजी स्पर्धक होती. तिच्या अशाप्रकारच्या कृत्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. तिनं आत्महत्या करण्याचं नेमकं कारण ज्यावेळी समोर आलं त्यावेळी अनेकांना नवल वाटलं आहे. चैत्रा सध्या रुग्णालयात उपचार घेत असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

कन्नड चित्रपटसृष्टीतील एक प्रसिध्द नाव आणि त्यांच्या बिग बॉसमधील नावाजलेली स्पर्धक म्हणूनही चैत्राचं नाव घ्यावे लागेल. स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तिनं गुरुवारी आपल्या घरी फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्या घटनेनंतर तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच चैत्राचं बिझनेसमन नागार्जुनशी लग्न झालं होतं. त्यावेळी सोशल मीडियावर फोटो शेअर करुन तिनं आपल्या लग्नाची माहिती शेअर केली होती.

टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिध्द झालेल्या माहितीनुसार, नागार्जुन हा लग्नाला तयार नव्हता. ही धक्कादायक बातमी समोर आल्यानंतर नागार्जुननं सांगितले, घरातल्या काही लोकांच्या आग्रहाला बळी पडून मला हे लग्न करावं लागलं होतं. मला चैत्राशी मनाविरोधात लग्न करावे लागले होते. 28 मार्चला नागार्जुनला चैत्राशी लग्न करावे लागले. त्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर झाले होते. वास्तविक चैत्रा आणि नागार्जुन अनेक काळापासून रिलेशनमध्ये होते. त्यावेळी चैत्राच्या परिवारातले सदस्य त्या लग्नाला उपस्थित होते. साधेपणानं हा विवाह समारंभ पार पडला होता.

लग्नानंतर चैत्रा जेव्हा नागार्जुनच्या घरी आली त्यावेळी तिला घरात येऊ दिले नाही. त्या दोघांनाही घराच्या बाहेर थांबवले होते. त्यांचे म्हणणे होते हे की मला लग्न आम्हाला मान्य नाही. या सा-या गोष्टी चैत्रानं पोलिसांना दिली आहे. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT