tollywood Manchu Vishnu severely injured in Kannappa shoot vnp98 Esakal
मनोरंजन

Vishnu Manchu: प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्याचा शुटिंग दरम्यान अपघात! हाताला गंभीर दुखापत

Vaishali Patil

साऊथ सिनेसृष्टीमध्ये अनेक स्टार आहेत ज्यांची फॅन फॉलोविंग फक्त साउथ पुरताच नाही तर जगभरात आहेत. मात्र आता साउथ फिल्म इंडस्ट्रीतून एक चिंताजनक बातमी आली आहे. लोकप्रिय तेलुगू अभिनेता विष्णू मंचू हा शुटिंग दरम्यान जखमी झाला आहे.

विष्णू त्याच्या आगामी 'कन्नप्पा' चित्रपटाच्या शुटिंगसाठी न्यूझीलंडला गेला आहे जिथे शुट दरम्यान तो जखमी झाला.

विष्णू हा 'गिन्ना', 'डायनामाइट', 'अनुक्षनम' यासारख्या लोकप्रिय सिनेमांसाठी लोकप्रिय आहे. विष्णू सध्या न्यूझीलंडमध्ये त्याच्या कनप्पा या मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. या चित्रपटात विष्णु केवळ अभिनयच करत नाही तर निर्मितीही करत आहे. याच 'कन्नप्पा' चित्रपटाच्या सेटवर तो जखमी झाला.

'कन्नप्पा' चित्रपटातील अॅक्शन सीन शुट करत असलेल्या ड्रोनमे त्याला दुखापत झाली आहे. सीनचे शूटिंग करत असताना क्लोज-अप शॉट्स घेण्यासाठी आलेला एक ड्रोन त्याच्या हाताला लागला. ड्रोनच्या ब्लेडमुळे त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली.

मिडिया रिपोर्टनुसार, "विष्णू 'कन्नप्पा' च्या अॅक्शन सीनच्या शूटिंगमध्ये व्यस्त असताना सिग्नलच्या गेल्यामुळे ड्रोन ऑपरेटरचे नियंत्रण सुटले आणि तो ड्रोन विष्णुच्या हातावर आदळला आणि क्रॅश झाला.

त्यामुळे ड्रोनच्या ब्लेडमुळे त्याच्या हाताला अनेक जखमा झाल्या आहेत. विष्णुला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या विष्णुवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. या अपघातामुळे चित्रपटाचे शुटिंग थाबवण्यात आले आहे.

2022 मध्ये असाच एक अपघात झाला होता ज्यात विष्णु गिन्नाच्या गाण्याच्या शूटिंगदरम्यान जखमी झाला होता. कन्नप्पामध्ये प्रभास, मोहनलाल, शिवा राजकुमार, नयनतारा, मधु बाला आणि इतरांसह तगडी स्टार-स्टड कास्ट आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर विष्णु विश्रांती घेणार आहे. त्यामुळे चित्रपटाचे शुटिंग लांबणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रजासत्ताक दिनापूर्वी शौर्याचा गौरव! ९८२ वीरांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर; यादीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?

Viral Video : हे फक्त भारतातच घडू शकते! व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल

PADMA AWARDS: पद्म पुरस्कारांची मोठी घोषणा! तमाशा कलाकार रघुवीर खेडकरांचा होणार पद्म पुरस्काराने सन्मान

T20 World Cup : पाकिस्तानने माघार घेतल्यास कोणता संघ त्यांची जागा घेईल? भारतासमोर बघा कोणता संघ उभा ठाकेल

"होता जिवा म्हणून वाचला शिवा"! शिवरायांचा जीव वाचवणाऱ्या जिवा महालाचे वंशज सध्या कुठे असतात? इतकी दयनीय अवस्था अन् हातावरचं पोट..

SCROLL FOR NEXT