tom and jerry 
मनोरंजन

'टॉम अँड जेरी' सिनेमाचा हा जबरदस्त ट्रेलर पाहून रमाल बालपणींच्या आठवणीत

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- अनेक वर्षांपासून प्रत्येकाच्या मनावर छाप पाडणारं कार्टून म्हणजे 'टॉम अँड जेरी'. उंदीर आणि मांजराचा हा खेळ, त्यांच्यातील मस्ती, कुरघोडी आणि भांडणं या कार्टुनमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. यातील टॉम( मांजर) आणि जेरी( उंदीर) या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अशी काही जादू केली आहे की आजतागायत प्रेक्षक हे कार्टुन विसरलेले नाहीत. आता तर या कार्टुनच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. हे कार्टुन आता लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच त्याचा ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला आहे.  

'टॉम अँड जेरी' या कार्टुनवर आधारित हा सिनेमा ३ डी लाइव्ह ऍनिमेशन असणार आहे. यात रिअल लाइफ वर्ल्डमध्ये टॉम आणि जेरी या दोन ऍनिमेटेड पात्रांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या सिनेमात अन्य कलाकारांसोबत टॉम  आणि जेरी ही दोन ऍनिमेटेड पात्र उभी करण्यात आली आहेत. नुकत्याच रिलीज झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची मनं जिंकली असून त्याच अंदाजात टॉम आणि जेरी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 

या ट्रेलरमध्ये, न्युयॉर्कमधील एका आलिशान हॉटेलमध्ये भारतीय परंपरेनुसार एक लग्नसोहळा सुरु असतो. या सोहळ्यात अचानक जेरी पोहोचतो आणि धुमाकूळ घालतो. त्यामुळे जेरीला पळवून लावण्यासाठी या लग्नाची वेडिंग इव्हेंट प्लॅनर टॉमची निवड करते. या हॉटेलमध्ये टॉम आणि जेरीचा पकडापकडीचा खेळ सुरु होतो. ज्यामुळे लग्नाच्या कार्यात अनेक मजेशीर किस्से घडतात. हे मजेशीर किस्से या सिनेमात पाहायला मिळणार आहेत.

या सिनेमात क्लो ग्रेस मोरेट्ज, मायकेल पेन्या, रॉब डलेनी, कॉलिन जोस्ट आणि केन जेंग ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. हा सिनेमा पुढच्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या या ट्रेलरने प्रेक्षकांची मनं जिंकली असून आतापर्यंत या ट्रेलरला २ लाख ३४ हजार ६९३ पेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत.  

tom and jerry film trailer going viral fans emotional many reactions  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT