Tom Cruise At Cannes Film Festival 2022 Google
मनोरंजन

'Cannes' च्या मंचावर टॉम क्रुझ का रडला?, पाहून उपस्थितही झाले भावूक

यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये टॉम क्रुझनं हॅलिकॉप्टरमध्ये बसून केलेली ग्रॅॅन्ड एन्ट्री पाहून उपस्थित प्रत्येकाचे डोळे दिपले.

प्रणाली मोरे

टॉम क्रुझ(Tom Cruise) हा जगभरातील प्रेक्षकांचा आवडता नट. त्याचं नाव हॉलीवूडच्या(Hollywood) अशा अभिनेत्यांमध्ये(Actor) घेतलं जातं ज्यांच्या चाहत्यांची संख्या अफाट आहे. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत तो तीन वेळा ऑस्कर,गोल्डन ग्लोब,ब्रिटिश अकादमी आणि अशाच काही इतर मोठमोठ्या पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते व्याकूळ असतात. सध्या फ्रान्समध्ये सुरु असलेल्या कान्स फिल्म फेस्टीव्हलच्या(Cannes Film Festival-2022) रेड कार्पेटवरील त्याच्या एन्ट्रीनं हे पुन्हा एकदा सिद्ध केलं.

त्याच्या एन्ट्रीच्या वेळी कार्यक्रम स्थळी तब्बल आठ फाइटर जेट्स उडत होते,जे आकाशात फ्रान्सच्या झेंड्यातील निळ्या आणि लाल रंगाची उधळण करीत होते. यापेक्षाही अधिक खास क्षण तो ठरला जेव्हा Top Gun Maverick च्या स्क्रिनिंग दरम्यान टॉम क्रुझचं ६ मिनिटं लोकांनी उभं राहून टाळ्यांच्या गडगडाटात कौतूक केलं. आणि हे पाहिल्यानंतर या दिग्गज अभिनेत्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. टॉमला या कार्यक्रमात कान्सच्या प्रतिष्ठित पुरस्कारानंही गौरविण्यात आलं.

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी Top Gun: Maverick स्टार्स टॉम क्रुझ आणि जेनिफर कोन्नेली यांनी हॅलिकॉप्टरमधून ग्रॅंड एन्ट्री केली. टॉमला पाहता क्षणीच साऱ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळून राहिल्या. हॅलिकॉप्टर मधून उतरल्यानंतर टॉमने चाहत्यांना हात उंचावून अभिवानदन केलं,प्रेम दिलं आणि त्यानंतर आपल्या कारमध्ये बसून मूळ कार्यक्रम स्थळाच्या दिशेने तो रवाना झाला. त्याच्या सोबत गाड्यांचा मोठा ताफा पहायला मिळाला.

Top Gun:Maverick थिएटर्समध्ये २५ मे रोजी प्रदर्शित झाला आहे. टॉमला कान्समध्ये जो सन्मान मिळाला,हे पाहून मात्र अभिनेता खूपच भावूक झाला. तो म्हणाला,''इथे येणं माझं स्वप्न होतं आणि तो या क्षणाला कधीच विसरणार नाही''. टॉमला या फेस्टिव्हलमध्ये एक खास सरप्राइज मिळालं,जेव्हा त्याला Palme d'or Award ने स्न्मानित करण्यात आलं. हे पारितोषिक स्विकारल्यानंतर तो अधिक भावूक झालेला दिसला.

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलीवूडकडून ऐश्वर्या राय बच्चन,पूजा हेगडे,हेली शाह,तमन्ना,उर्वशी रौतेला आणि नवाझुद्दिन सिद्दिकी सामिल झाले आहेत आणि या सर्वांनी कान्सच्या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर उपस्थित राहून भारताची मान उंचावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT