Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha
Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha  
मनोरंजन

वादानंतर 'नाय वरनभात लोन्चा..' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावरून हटवला

स्वाती वेमूल

महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' (Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृश्यांवरून विविध स्तरांवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ट्रेलरमध्ये महिला आणि अल्पवयीन मुलाचे जे दृश्य आहे, त्याबाबत ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अनेक पालकांनी आक्षेप नोंदवला असून हे दृश्य चित्रपटातून वगळण्यात यावं अशी मागणी होत आहे. इतकंच नव्हे तर राष्ट्रीय महिला आयोगाकडून दिग्दर्शक महेश मांजरेकरांना (Mahesh Manjrekar) लेखी खुलासा करण्याबाबत पत्र पाठविण्यात आलं आहे. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर आता या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावरून हटवण्यात आला आहे.

'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाचे निर्माते श्रेयांश हिरावत म्हणाले, 'सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्म्सवर अपलोड केलेला ट्रेलर हा सेन्सॉर केला होता. १८ वर्षांवरीलच प्रेक्षकांना तो पाहता येईल, याची काळजी आम्ही घेत आहोत. युट्यूबवरील ट्रेलरवर वयोमर्यादा स्पष्ट केली असली तरी अशा प्लॅटफॉर्म्सवर आमचं नियंत्रण नाही. कोणीही त्यावरून डाऊनलोड करू शकतो आणि शेअर करू शकतो. या सर्व बाबींवर लक्ष ठेवणं आमच्यासाठी शक्य नव्हतं. महिला आयोगाच्या पत्रानंतर आम्ही सध्या तो ट्रेलर हटविला आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता, त्यामुळे आम्ही सर्व प्लॅटफॉर्म्सवरील ट्रेलर तुर्तास हटविला आहे. '

महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने 'A' प्रमाणपत्र दिलं आहे. 'हा अडल्ट फिल्म आहे, असं सर्व होर्डिंग्स आणि पोस्टर्सवर स्पष्ट केलं होतं', असं निर्माते म्हणाले. १४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील काळ जवळपास तीन दशकांपूर्वीचा आहे. त्याकाळी झालेल्या गिरणी कामगारांच्या संपाचा, संपकरी आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवनावर झालेला भीषण परिणाम, त्यांची विदारक परिस्थिती, त्यांनी सहन केलेल्या वेदना, संपामुळे पूर्णत: वाताहत झालेली पिढी आणि त्याचे समाजात उमटलेले पडसाद 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा'मध्ये पहायला मिळणार आहेत.

वादाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या टीमकडून स्पष्टीकरण-

'आमची टीम पाच दशकांहून अधिक काळ मीडिया आणि मनोरंजन इंडस्ट्रीचा अविभाज्य भाग आहे आणि आम्ही नेहमीच महिलांचा आदर केला आहे. अशा प्रकारच्या समस्यांना आम्ही नेहमीच गांभीर्याने घेतल्या असून त्यांच्यावर तातडीने कारवाई केली आहे. महिलांचा आदर आणि राष्ट्रीय महिला आयोगाने महिलांच्या कल्याणासाठी केलेली विविध कामं लक्षात घेऊन, आम्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हा ट्रेलर तात्काळ काढून टाकला आहे,' असं निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईने जिंकली नाणेफेक! जाणून घ्या दोन्ही संघाची प्लेइंग ११

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला अन्..; पाहा व्हिडिओ

'श..श...शशांक...', KKR विरुद्ध विजयानंतर पंजाबच्या पठ्ठ्यानं शाहरुखच्या स्टाईलमध्ये ईडन गार्डन्सचे मानले आभार, पाहा Video

Bank Crisis: मोठ्या आर्थिक संकटाची सुरुवात? अमेरिकेत आणखी एक बँक दिवाळखोर; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT