Tripti Dimri Boyfriend Esakal
मनोरंजन

Tripti Dimri Boyfriend: अनुष्का शर्माच्या भावानंतर कुणाला डेट करतेय नॅशनल क्रश तृप्ती? मोठ्या उद्योगपतीसोबत जोडलं जातयं नाव!

अॅनिमलमध्ये झोयाची भूमिका साकारणारी तृप्ती डिमरी सध्या चर्चेत आहे.

Vaishali Patil

Tripti Dimri Boyfriend: रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' हा सिनेमा रिलिज होऊन आता बरेच दिवस झाले असले तरी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

तर या चित्रपटामुळे बॉबी देओलच्या सेकंड इनिंगची चर्चा सुरु झाली तर चित्रपटातील भाभी 2 ची भुमिका साकारणाऱ्या तृप्ती डिमरीला देखील रातोरात प्रसिद्धी मिळाली. झोयाची भुमिका साकारणारी तृप्ती या चित्रपटामुळे नॅशनल क्रश झाली आहे.

आता तृप्ती डिमरीबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. तृप्ती डिमरीच्या डेटिंगच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. सोशल मिडियावर याबाबत चर्चा आहेत. तृप्ती एका श्रीमंत उद्योगपतीला डेट करत असल्याचं बोललं जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तृप्तीने अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मालाही डेट केले आहे. तृप्ती कर्णेशच्या 'बुलबुल' सिनेमात दिसली तेव्हा त्यांच्या अफेयरच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर तृप्तीने कर्णेशच्या कला चित्रपटातही काम केले.

कर्णेश शर्मा आणि तृप्ती पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमातही एकत्र दिसले होते. त्याचे अनेक रोमँटिक फोटोही व्हायरल झाले होते. मात्र तृप्ती किंवा कर्णेश या दोघांनीही त्यांचे नाते अधिकृत केले नव्हते.

काही महिन्यांपूर्वी त्यांच्या ब्रेकअपची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. आता ब्रेकअपनंतर तृप्तीचं नाव पुन्हा दुस-यासोबत व्यक्तीसोबत जोडलं जात आहे.

आता तृप्ती डिमरीचे नाव उद्योगपती सॅम मर्चंटसोबत जोडले जात आहे. तिने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक सेल्फी शेअर केला आहे, जो सध्या चर्चेत आला आहे. या फोटोत ती सॅम मर्चंट नावाच्या व्यक्तीसोबत दिसत आहे.

हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यामुळे आता तृप्ती डिमरी सॅम मर्चंटला डेट करत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. इतकच नाही तर ती सॅमसोबत पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ट्विन्स करताना दिसली.

सॅम हा व्यापारी असून त्याचे गोव्यात रेस्टॉरंट आहे. सॅमबद्दल बोलायचे झाले तर काही वर्षांपूर्वी तो मॉडेल होता. 2002 मध्ये त्याने 'ग्लॅडरॅग्स मॅनहंट कॉम्पिटिशन'चे विजेतेपदही पटकावले.

आता तो गोव्यात 'वॉटर बीच लाउंज अँड ग्रिल' नावाने स्वतःचा क्लब आणि हॉटेल चालवतो. मात्र, सॅम आणि तृप्ती हे खरोखर रिलेशनशीपमध्ये आहेत की केवळ अफवा आहे याबाबत दोघांनीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ नागरिक आक्रमक! 'डीजेमुक्त सोलापूरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'; डीजेग्रस्तांचा आवाज जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या कानावर

Vice President Election 2025 : बहुमत नाही म्हणून एनडीएची विरोधी पक्षांना मतदानाची विनंती; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा दावा

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिरची होती का? जेवणात काय झणझणीत वापरत होते?

Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा

Panchganga River : पंचगंगा नदी धोका पातळीपासून ३ इंच दूर; बावडा-शिये मार्ग बंद, नदीकाठी सतर्कतेचा इशारा, 'या' मार्गांवर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT