shruti das 
मनोरंजन

'मीसुद्धा माणूसच'; सावळ्या रंगावरून ट्रोल करणाऱ्यांविरोधात अभिनेत्रीची तक्रार

'आता ही अवहेलना सहन होत नाही'

स्वाती वेमूल

गोऱ्या रंगाचं आकर्षण असलेल्यांकडून सावळ्या रंगाची अवहेलना होण्याच्या घटना अनेकदा घडत असतात. मात्र वारंवार त्वचेच्या रंगावरून खिल्ली उडवली जात असेल तर मग त्यावर शांत बसणं योग्य नाही, हे अभिनेत्री श्रुती दासने पटवून दिलं. बंगाली अभिनेत्री श्रुती दास Shruti Das हिने कोलकाता पोलिसांकडे याविरोधात तक्रार दाखल केली आहे. 'गेल्या दोन वर्षांपासून सावळ्या रंगावरून अनेकांनी ट्रोल केलं. मात्र आता ही अवहेलना सहन होत नाही. रंगावरून माझ्या खासगी आयुष्यापर्यंत ट्रोलर्सकडून टीका केली जाते. म्हणूनच मी पोलिसांकडे तक्रार दाखल केली', असं ती म्हणाली. श्रुतीने २०१९ साली 'त्रिनयनी' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. (Trolled For Skin Colour Actor shruti das Files Police Complaint says I am a human too)

'माझ्या आजूबाजूच्या लोकांना या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला मला दिला. मात्र आता हे माझ्या सहनशक्तीपलीकडे गेलंय. 'त्रिनयनी' या मालिकेच्या दिग्दर्शकासोबत मी रिलेशनशिपमध्ये असल्याचं कळताच लोकांनी मला अधिकच ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यांनी माझ्या प्रतिभेवरही प्रश्न उपस्थित केले. आता जर मी हे सहन करत बसले, तर पुढे त्यांना ट्रोल करण्याची आणखी मोकळी संधी मिळत जाईल', अशा शब्दांत श्रुतीने तिची व्यथा मांडली.

२०१९ पासून अशा ट्रोलिंगचा सामना करत असल्याचं श्रुतीने तिच्या तक्रारीत स्पष्ट केलं. सोशल मीडियावरील कमेंट्सचे स्क्रीनशॉट्सदेखील तिने त्यात जोडले. फक्त तीच नव्हे तर इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या कलाकारांना अशा टीकांना सामोरं जात असल्याचं श्रुतीने म्हटलं. 'भारतासारख्या देशात, जिथे अनेकजण सावळ्या रंगाचे आहेत, तिथे रंगावरून टीका होणं लज्जास्पद आहे', असं मत अभिनेत्री पर्णो मित्राने मांडलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT