trupti desai  google
मनोरंजन

गाढवावरून धिंड काढली तर.. तृप्ती देसाई पुन्हा भडकल्या

कुटुंब नियोजन किटमध्ये देण्यात आलेल्या रबरी लिंगाच्या समर्थनावरून तृप्ती देसाई यांच्यावर टीका होत होती. यावेळी बेताल टीकाकारांना तृप्ती देसाई यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

नीलेश अडसूळ

राज्य सरकारच्या सार्वजानिक आरोग्य विभागाने कुटुंब नियोजन किटमध्ये रबरी लिंग दिले होते. यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली. हा प्रकार अत्यंत गैर असल्याचे सांगत अनेकांनी सरकारला धारेवर धरले. परंतु सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी मात्र प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आपले मत मांडले.

'सरकारने कोणतीही चूक केली नाही. संकुचित विचारसरणी मधून बाहेर पडून याकडे पाहायला हवे. अशा वर्कर्स ने लाज न बाळगता ग्रामीण भागात जाऊन महिलांमध्ये कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करायला हवी,' असे मत तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. देसाई या त्यांच्या आंदोलनामुळे नेहमीच चर्चेत असतात. या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांनी लोकांसमोर आपले विचार मांडले आहे.

trupti desai

परंतु त्यांच्या या मताला विरोध करणारेही तितकेच आक्रमक झाले. अनेकांनी त्यांच्यावर पातळी सोडून टीका केल्या, घाणेरड्या शब्दात त्यांच्यावर वैयक्तिक टिपण्या करण्यात आल्या. याचा तृप्ती देसाई यांनी तीव्र निषेध करत कठोर शब्दात टीकाकारांना झोडपले आहे. याबाबत एक सविस्तर फेसबुक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

तृप्ती देसाई म्हणतात...

प्रवाहाच्या विरोधात बोलायची हिंमत ठेवते, त्यामुळे गेल्या सात वर्षापासून आपल्यावरील टीका सहन करण्याची शक्ती वाढली आहे….
पण एक मात्र नक्की सांगेन, माझ्या मुद्द्याला ज्यांनी ज्यांनी विरोध केला, मला अश्लील कमेंट केल्या तेच माझ्याबरोबर सेल्फी काढायला येत असतात, त्यांच्या घरातील महिलेवर अन्याय झाला तर माझ्याकडे मदतीसाठी येत असतात आणि कमेंट बाबत जाब विचारला तर जाहीर माफी मागत असतात. कामाची शक्ती कृतीतून दाखवायची असते, जी आत्तापर्यंत मी दाखवली आणि यापुढेही नक्कीच चांगले काम करीत राहीन.
बाकी घाणेरड्या कमेंट करणाऱ्यांची मानसिकता त्यांनी स्वतः तपासली तर त्यांचे आयुष्य चांगले होईल, आम्हाला असल्या कमेंट्सने काडीमात्र फरक पडत नसतो यासाठीच ही पोस्ट.
पण आमच्या महिलांनी चुकून जर तुम्हाला शोधून चोप दिला आणि गावात धिंड काढली तर त्याला तुमची स्वतःची कमेंटच जबाबदार असेल, अशी ही पोस्ट आहे. सध्या ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Reacts To Fadnavis : मराठी हिंदू महापौर घोषणेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले डोंब कावळे...

Farmer News: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! २ लाख रुपयांपर्यंतचे मुद्रांक शुल्क माफ; महायुती सरकारची महत्त्वाची घोषणा

त्याने स्वतःला गोळी मारल्यावर घराबाहेर २०० पोलीस होते... गोविंदाची भाची रागिणीचा खुलासा; म्हणाली- ते खोटं असतं तर...

Raj Thackeray : ठाकरे बंधूंकडून जाहीरनामा प्रकाशित, राज ठाकरे २० वर्षांनंतर शिवसेना भवनात; सांगितली जुनी आठवण, नेमकं काय म्हणाले?

भारतात होणाऱ्या T20 World Cup साठी बांगलादेश संघाची घोषणा, मुस्तफिजूरचाही समावेश; कर्णधार कोण?

SCROLL FOR NEXT