Tu Jhoothi Main Makkaar movie  Instagram
मनोरंजन

रणबीर - श्रद्धाचा 'Tu Jhoothi Main Makkar'बॉक्स ऑफिसवर हिट की फ्लॉप? काय सांगतात कमाईचे आकडे?

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या त्यांच्या 'तू झुठी में मक्कार' या चित्रपटासाठी खूप चर्चेत आहेत. रिलीज होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या नव्या जोडीला प्रेक्षक खुप पसंत करत आहेत.

'तू झुठी में मक्कार' हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित झाला होता. लव रंजन दिग्दर्शित या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाची सुरुवात उत्कृष्ट झाली आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास 15 कोटींचा व्यवसाय केला आहे. जे वीकेंडला वाढणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

यासोबतच चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही चांगली कमाई केली आहे. 'तू झुठी मैं मक्कार' चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत.

या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी ९ कोटींचा व्यवसाय केला आहे. तसेच, गुरुवारी या चित्रपटाचे कलेक्शन 10 कोटींच्या आसपास होते. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आतापर्यंत 26.07 कोटींचा व्यवसाय केला आहे.हे आकडे चित्रपटाच्या ओपनिंगसाठी चांगले आहेत. त्यामुळे आता वीकेंड चा फायदा नक्कीच होईल.

विकेंड संपल्यानंतर चित्रपटाचे कलेक्शन 70 ते 80 कोटींवर जावू शकते असा अंदाज आहे. यासोबतच चित्रपटाच्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता26.07 कोटी रुपये झाले आहे.

या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरशिवाय अनुभव सिंग बस्सी मुख्य भूमिकेत दिसला होता. याशिवाय डिंपल कपाडिया, बोनी कपूर, हसलीन कौर, राजेस जैस, आयशा राजा मिश्रा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

चित्रपटाचे संगीत प्रीतम दा यांनी दिले आहे. हा चित्रपट जवळपास 95 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. तसेच चित्रपट प्रदर्शित होताच या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून बॉलिवुडकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT